पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४

चांगला होणार नाहीं. तो कधीं तरी तुम्हांस खचित खचित पश्चात्तापच करावयास लावील, हें पक्कें समजून ठेवा; विचर करा."

 ३. हे चक्रवर्ति राजा, जशी गोरी तशी काळी हीही आह्मी तुझीच प्रजा आहोंत. खरें ह्मणशील तर, ते तर तुझे औरसच बालक आहेत; पण आह्मांस तूं प्रेमानें आपल्या अंकावर घेऊन वाढविलें आहेस, त्या अथ त्यांच्यापेक्षां देखील आमच्यावर तुझी अधिकच दया असली पाहिजे. व तुझ्याकडून तुझ्या अधिकारीवर्गास आह्मां उभयतां भावांस समानवृत्तीनें वागविण्याविषयीं आज्ञाही आहे; पण, कित्येक अधिकारी त्या तुझ्या वात्सल्यगर्भ आज्ञेचें उल्लंघन करितात, व आह्मांस तसे वागवीत नाहींत; आमचे गोरे बंधु देखील तुझ्या इच्छेप्रमाणें आमच्याशीं प्रेमानें दोन शब्द बोलत नाहींत, आह्मांस कांहीं देत नाहींत व सुखदुःखही विचारीत नाहींत. तूं तर सातसमुद्रांपलीकडे राहतोस तेव्हां आतां आमचें दुःख तरी कोणास सांगावें? हीं तुझीं लेंकरें सुखांत नाहींत बरें! ह्याकरितां तूं धावून आमच्याजवळ येऊन रहा किंवा आम्हांपैकीं कोणास तरी तुझ्या सहवर्तिजनांत ठेव. तसें केल्यावांचून आम्हांस सुख मिळणार नाहीं."

 ह्या तीन उदाहरणांपैकीं पहिल्यांत बोलण्याप्रमाणें भाषा लिहिली आहे. दुसऱ्या उदाहरणाच्या भाषेंत आवेश आहे आणि तिसऱ्या उदाहरणाच्या भाषेंत कळवळा आहे.