पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९१

सिद्ध करण्यास्तव योग्य कारणें दाखविण्याकडे ग्रंथकाराचा कल विशेष असतो, अशी जी लेखनपद्धति तीस सरला म्हणावें.

 ही लेखनपद्धति इतिहास, शास्त्रीयविषयविवेचन, सामान्य वर्णनें इत्यादिक विषयांस चांगली उपयोगीं पडते, व हिच्यांत अर्थाला प्राधान्य असतें. जसें --

 “स्त्रियांच्या अतिसहवासनें मनुष्यही बाइलबुध्या होतो; त्याला बायकी विचार आवडूं लागतात, व बायकांच्या अंगीं असणारे जे भित्रेपणा, स्वार्थपरता व मनाची अनुदारता हे दोष, ते त्यासही जडतात. संगतीनें मनुष्याचें मन पालटतें ही गोष्ट अनुभवसिद्ध आहे. जन्मापासून मनुष्यास पशूंच्या सहवासांत ठेविलें तर तो भाषा बोलू शकत नाहीं असा अनुभव आला आहे. वीर पुरुषांच्या संगतीनें स्त्रियांनींही लढाया मारल्याची उदाहरणे आहेत. साधु पुरुषांच्या संगतीनें दुष्ट लोकही सुष्ट झाले आहेत; तस्मात् संगतीनें एकाचे गुण दुसऱ्यास चिकटले तर त्यांत कांहीं आश्चर्य नाहीं. ह्याकरितांच संगति चांगल्या पुरुषाचीच करावी असें शहणे लोक सांगतात.

ललिता.

  ज्या लेखनपद्धतींत शब्दरचना मनोहर, मृदु, कठोर किंवा प्रौढ अशी करण्याकडे विशेष लक्ष दिलें असतें, त्या लेखनपद्धतीस ललिता असें म्हणावें. हिच्यांत शब्दाला प्राधान्य असत. जसें --