पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९०

गेलें म्हणजे तें पुन्हां पूर्वीसारखें प्रफुल्लित होत नाहीं, त्याप्रमाणे एकदां पराजित झालेला देश पुनः भरभराटीस येत नाही."

 ह्या उदाहरणांतील दृष्टांतालंकारानें वर्णनीय अर्थास बळकटी आणिली आहे.

मनोवृत्तीची जागृति.

 "तेलांत बिंदु पडला असतां तो जसा एकदम विस्तृत होतो त्याप्रमाणें, ही वार्ता महादजीच्या कानीं पडतांच क्रोधानें त्याच्या सर्व शरीरांत एकदम संचार केला."

 ह्या उदाहरणांतील उपमालंकारानें क्रोधाचें आधिक्य सुचविलें आहे.

भाषासरणि.

 भाषासरणि म्हणजे भाषा लिहिण्याची पद्धति. भाषा लिहिण्याच्या निरनिराळ्या ग्रंथकारांच्या निरनिराळ्या तऱ्हा असतात. त्या सर्व तऱ्हांचा विचार केला असतां भाषासरणीचे पांच मुख्य प्रकार करितां येतील. ते असे: --

 १ सरला, २ ललिता, ३ सरसा, ४ मथुरा आणि ५ प्रौढा.

 ह्यांचे आणर अनेक पोटभेदही आहेत, पण ते ह्या लहानशा पुस्तकांत दाखवितां येत नाहींत.

सरला.

 ज्या लेखनांत केवळ अभीष्टार्थबोधक कोणते तरी शब्द असतात, वाक्ये लहान, अन्वय सरळ, व अभीष्टार्थ


१ मा. मो. पु. प.