पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८७

करविल्यानें तो सौम्य वृत्ति स्वीकारील अशी आशा करणें होय.”

 ह्यांत स्वैर जनांचें जें स्वधर्माकडे मन वळणें, तेंच सर्पानें सौम्य वृत्ति स्वीकारणें होय. असा दोन वाक्यांचा अभेद केला आहे.

विशेषोक्ति.

 कार्योत्पत्तीस लागणारी कारणसामग्री असतांही, कार्याची उत्पत्ति झाली नाहीं असें जेथें वर्णन येतें, तेथें विशेषोक्ति अलंकार होतो. जसें--

 "शून्य आकाशांतही डायनामाइटचा ध्वनि गेला असतां जलवृष्टि होते; पण सभाबंदीचा कायदा होतेसमयीं लक्षावधि लोकांचा आक्रोशध्वनि दयाघन सरकारच्या कानीं गेला तरी त्यांतून दयेचा एक बिंदुही आमच्या वांट्यास आला नाहीं."

 ह्यांत दयारूप कार्योत्पत्तीस आक्रोशध्वनिश्रवण हें कारण असतांही कार्योत्पत्ति झाली नाहीं, असें दाखविलें आहे.

व्याजस्तुति.

 वरून स्तुति पण आंतून निंदा असें जेथें वर्णन असतें तेथें व्याजस्तुति अलंकार होतो. जसें --

 "हिंदुस्थानांत यत्किंचित्ही कोणास दुःख होऊं नये, अशा उदार व दयार्दबुद्धीच्या मॅंचेस्टरच्या व्यापारी लोकांस, अधिक वेळ काम करावें लागतें इतकें देखील