पान:भाषासौंदर्यशास्त्र.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८६

निघूं लागल्या. तेव्हां त्या प्रलयकालाची ही विजयपताकाच आहे कीं काय असें भासे."

 २. "ब्रॉडलाचें भाषण ऐकिलें म्हणजे, साक्षात् सरस्वतीच जणूं काय आह्मां लोकांच्या अनादरास त्रासून म्लेंच्छरूपानें प्रकट झाली असें वाटे.”

 यांतील पहिल्या उदाहरणांत, ज्वालांवर पताकेचा, आणि दुसऱ्यांत ब्रॉडलावर सरस्वतीचा तर्क केला आहे.

दृष्टांत.

 एक गोष्ट सिद्ध करण्याकरितां त्यासारख्याच दुसऱ्या एखाद्या गोष्टीचा दाखला दिला जातो तेथें दृष्टांतालंकार होतो. जसें--

 "इंग्कंडांत वक्तृत्वकला येथल्यापेक्षां जरी अधिक वृद्धि पावली आहे, तरी तेथेंही उत्तम वक्ता हजारांत एखादाच निपजतो. अरण्यांत हजारों वृक्षांत चंदनवृक्ष एखादाच असतो."

 ह्यांत वक्त्याची दुर्मिळता सिद्ध करण्यास्तच त्यासारख्या चंदनवृक्षाच्या दुर्मिळतेचा दाखला दिला आहे.

निदर्शना.

 दोन वाक्यार्थांच्या रूपकाप्रमाणें जेथें अभेद दाखविला असतो तेथें निदर्शनालंकार होतो. जसें--

 "अशा स्वैर लोकांचें तुमच्या उपदेश स्वधर्माकडे मन वळेल अशी आशा बाळगणें म्हणजे सर्पाला दुग्धपान