Jump to content

पान:बाबुर.pdf/350

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ४३ ) जा, गा मद्दानगुणा, दिधलें तुज जीवदान जा जा गा, । जागा दाटुनि केल्या हरि, वांचाया नसे गजा जागा. ॥ ३८ ॥ (कर्ण. ३१-४१) (वरच्या ३८ व्या गीतींत आद्य यमकही साधिलें आहे.) (६) दामयमकः–वृत्ताच्या जवळच्या दोन चरणांस जोडणाच्या यमकास दामयमक ह्मणतात. याचे उत्कृष्ट उदाहरण मोरोपंताचे दामरामायण होय. या यमकप्रकाराची थोडींशीं उदाहरणे: सेवुनि संतत पाला, संत तपाला यदर्थ करितात, । तो प्रिय या स्तवना कीं यास्तव नाकींहि हेचि वरितात.॥३९॥ (भीष्मभ.११७) पुसोनियां शोकपाणी, पाणी जोडूनियां नयें, । रामापुढे दीनवाणी, वाणी भरत हे स्वयें. ॥ ४० ॥ (कुशलवा. ३-५) करूनियां मज्जन विश्वपावनी, वनीं प्रवेशे मग जानकी वनीं; ॥ सचिंत पाहे मग देवरास ती; । सती ह्मणे आश्रम कां न दीसती. ॥ ४१ ॥ | (कुशलवा. ४-१७) ह्मणे श्रीरामरमणी रमणीय वपुर्धरा ।। धराकन्या जगत्पद्मा पद्माक्षी कंबुकंधरा. ॥ ४२ ॥ (कुशलवा. २-२०) त्याचे करूनि निवारण वारणशत्रुप्रताप कुश बोले । धरुनि वृथा काम रणीं कां मरणीं सिद्ध मूढ हे झाले.॥४३॥(कुशलवा.१३-१२) गुणग्रहण दक्ष ते ह्मणति साधु साधु क्षमा । क्षमादुहितृनंदना ! धरु तुझा सदा पक्ष मा ॥ क्षमाबळपराक्रमद्युति यशोनिधी सर्वदा ।। वदान्यपति हो सुखी चिर वसे सुहृत्सर्वदा. ॥ ४४ ॥ (कुशलवा. १३-५१) (७) समुद्यमकांची उदाहरणे: बहुमान सदा सांवरि साधु निका महित सज्जन वनौका । बहु मानस दासावर साधुन कामहित सज्ज नवनौका ॥ ४५ ॥ (नामरसायन ३२ अनलसमीहित साधी राया ! वारा महीवरा ! कामा । अनलस मीहि तसा धीरा ! यावा रामही वरा का मा १ ॥ ४६ ॥ (वनपर्व ८-५०) | (८) संदंश यमकाची उदाहरणे: हार विलासवतीने केला हा लक्ष्मणप्रसूनें कीं;। हारविला सवतीने क्षितिने पुजिला सुरप्रसूनें कीं. ॥ ४७ ।। (स्त्रीपर्व ४-१६) अश्वत्था मागावा वर पूजुनि परि भला नव्हे मुंजा; ।। अश्वत्थामा गावा की तो गुरु खंडिजेचि शरपुंजा. ॥ ४८ ॥ (कर्ण, ११-३१) तोया याद वराया ज्या प्रेम्या धरितसे, भला भजनीं तो या यादवराया प्राप्त असो, की दुजा न लाभ जनीं.॥४९॥(विष्णुपदवकिली२८) पुंडरिका ! क्षमा केली त्वां वैकुंठाधिका सदा. ।। पुंडरिकाक्ष माकेलीस्थाना त्या नाठवी कदा. ॥ ५० ।। (पुंडरीकप्रार्थना १५)