Jump to content

पान:बाबुर.pdf/349

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ४२ ) (पंतांच्या काव्यांत दोन अर्धाच्या शेवटीं जीं यमके आढळतात ती याचींच उदाहरणे होत. त्यांतील कांहीं लांब यमकें पुढे दिली आहेत.) (३) पुष्पयमकः–वृत्तांत यति येणारी अक्षरें सारखी जुळविली असल्यास पुष्पयमक होते, त्याची उदाहरणें केका ११८, ११९ ह्या होत. त्याची आणखी थोडी उदाहरणे: कितेक रथ मोडिले, ध्वज क्रितेकही तोडिले, ।। कितेक शर सोडिले, गज कितेकही झोडिले, ॥ असंख्य भट ताडिले, यमपुराकडे धाडिले.।। शिरःप्रकर पाडिले, बहुत यापरी नाडिले. ॥ २९ ॥ (कुशलवा. १०-९) शिळेसि दिधली गती, जिस महामुनी मागती, । द्विषत्सहज सन्नती करि, तयासि अत्युन्नती, ॥ करूनि नत पावती, वरिति सिद्धि दे पाव ती, ।। जयास खळ कांपती, अजित आमुचा तूं पती. ॥ ३० ॥ (कृष्णवि.५६-३०) ( कृष्णविजय अध्याय ५६ श्लोक २९, ३१ व ३२ ह्यांतही पुष्पयमक साधिलें आहे. ) (४) अश्वधाटी यमकः-‘यमकाच्या पाठीं व पुढे निराळे व्यंजन असल्यामुळे, प्रत्येक व्यंजनावर जशी काय उडी मारित यमक चालले आहे, असा भास झाला ह्मणजे अश्वश्राटी यमक झाले. हे जसें चरणाच्या आरंभापासून तसे एकदम मधून व आद्यंतही गुंफलेले आढळतें' ( अलंकारमीमांसा ). याची थोडी उदाहरणे: पाजत, गाजत, लाजत साजत राजतरणी पुरा गेला. ॥ ३१ ॥ (शांति. ५-३) हरिजन अरिजन परिजन करि, जननि ! प्राज्ञजनसभे ! काय । हा दास यास हास त्रास नसो,-शिशुसि निंदिनी माय.॥३२॥(स्वर्गारोहण.२-४८) टुनि वाटुन घाटुनि चाटुनि पीतोसि विष मरायाते. ॥ ३३ ॥ (गदा. १९०) न धरीं बा ! दूर, हा दर, सादुर दे वाजवू पुन्हां नीट. ॥ ३४ ॥ (विराट.४-८ (५) आद्यंत यमकः-चरणाच्या किंवा अर्धाच्या आरंभीं व अखेर यमक साधिले असले तर त्याला ‘आद्यंत यमक' ह्मणतात. याची थोडी उदाहरणे: गळतीसमान नयनें गळती; । लपने न येति धड आलपने; ॥ निजविग्रहासि उठवी निजवी; । जनकात्मजा स्मरतसे जनका. ॥ ३५ ॥ (कुशलवा. ४-७०) शोक लास्य करी हृदंगणं कंठ केवळ शोकला; । कोमलानन पूर्णचंद्र तिचा तदा बहु कोमला; ॥ कां पती रुसला ह्मणे सकळंद्रियें बहु कांपती; । भार तीस निजांग होय, वदे अशी मग भारती. ॥ ३६ ॥ (कुशलवा. ४-५ कां नवलास नव्हे, घट कर्ण गळी जरि बसेल कानवला?॥३७॥(द्रोण.१०-२१