________________
| ( ३० ) जसे होती देव प्रमुदित शचीनायक वनीं, । तसे सारज्ञाते बुधजन मयूरेश कवनीं; ॥ १५ ॥ (मंत्र. उपसं. १२) माजी सत्कृति दूषिली जरि खळे उच्छृखळे आग्रहें, ।। सेवावीच परंतु नित्य रसिकें हे सणाच्या गृहे; ॥ चंडाळ त्रिदशापगेंत वमला कीं धेनुला स्पर्शला, । त्यांचे श्रोत्रियदेवसेव्य पयही, त्याही सदा निर्मला. ॥ १६ ॥ (मंत्र. उपसं. १३) खळ निंदिति ह्मणुनि बुधे टाकावी काय हरिगुणासक्ति? ।। ' दीरनणंदाजाचें साध्वी न यागिती सुपतिभक्ति. ॥ १७ ॥ (मंत्ररा. उपसंहार ५) ॥ काव्य करावें म्यां नच वचकावें दूषिती परि लघूस ।। कां न सदन वांधावें कीं त्यांत पुढे बिळे करिल घूस. ॥ १८ ॥ (सन्मनोरथराजि ९) हा कवि मयूर हर्षे सद्धन पाहोनि सरस नाचावा, । अति विस्मयें ह्मणावें, खळ हो! निंदूनि न रसना चावा. ॥ १९ ॥ (सन्मनो. ७०) प्राकृत ह्मणोनि निर्भर हांसोत अतज्ञ नीच मत्कृतिला ।। यरि जाणशील वा ! तू रसिक कविवरा ! मनीं चमत्कृतिला. ॥ २० ॥ (नामरसायन ६९) तुमच्या पदप्रसादें फार चमत्कार अर्थ यमकांचे ।। त्यांत प्रभुयश, तद्वशजगदुद्धाराधिनेचि यम कांचे ॥ २१ ॥ (नामरसा. ६९) प्रेम, प्रतिभा, शिक्षारीति पहा, आयका बरें कवन; । पवनप्रियपुत्रा ! वा ! म्यां हें केलें न निजगुणस्तवन. ॥ २२ ॥ (नामरसा. १०३) आर्यामुक्तामाला दावीन परंतु जरि न मागाल; । लागाल प्रभुकटीं घालू, फुगवील कीं रमा गाल. ॥ २३ ॥ (नामरसायन १०९) संत मयूरेश्वर कृत कवनीं नवनीत कोसळी गोडी । घेतील कीं तयाची करणे परगुणविवृद्धि ही जोडी. ॥ २४ ॥ (प्रश्नोत्तररत्नमाला, उषसंहार) पद्माकांत पाच ‘कृष्णविजय' ग्रंथांबुजन्मांजली ।। भावें वंदुनि अर्पिला हरिजनांमध्ये किती जे अली, । ते याचा रस सेवितीलच शिरीं वाहेल सन्मंडली । । हा स्वस्वामिपदप्रसाद खल तो भीतील जैसा कली. ॥ २५ ॥ (कृष्ण० ९० उपसं. ४)