________________
| २८४ मोरोपंतकृत स्मरे घडिघडि, प्रभो ! भैवपयोधिच्या परदा ! ॥ तुझे यशचि तारितें, परि न केवळा तारखे; सहाय असिला असे, तरिच शत्रुला मारवे; । ११९ असून आतां ब्रह्ममानसपुत्र झालों में सर्व भगवत्कृपेचे माहात्म्य असे नारदाच्या मनांत वारंवार येऊन तो तुमचे यश वर्णित गात नाचत असतो. भगवंतांनी केलेले उपकार नारद विसरला नाहीं.. १. घटकोघटक, वारंवार, पुनः पुनः. २. भव-संसार+पयोधि=सागर, त्याच्या; संसारसमुद्राच्या संसाराला सागराची उपमा देणे हे कविजनांला अत्यंत संमत आहे. ही उपमा विस्तारास्तव, ती तरून जातांना लागणाच्या संकटांस्तव, व अगाधत्वास्तव फार सरस होय.३. पार दाखविणा-या ! संसारसमुद्राच्या पैलतीरीं नेणान्या ! ईश्वर हा संसारसागर सुखरूप तरून जाण्यास उत्तम वाटाड्या होय. ठरीव यमकः-‘पारदा' व 'नारदा' हे पंतांचे आवडते व ठरीव यमक होय. याची उदाहरणे त्यांच्या काव्यांतून पुष्कळ आढळतात. [केका ११२ पहा, कृष्णविजय-उत्तरार्ध-अ० ५५ श्लो० ३८ पृ० ३७.] ४. प्रास्ताविकः-नारद ब्रह्मपुत्र झाला, तसेच तो संसारसमुद्रांत तरला याचे कारण त्याला साधूंच्या मुखाने भगवत्कथा श्रवण करण्यास सांपडली यावरून कवि यांत सत्संगतिमाहात्म्य वर्णितात. अन्वयार्थः-[देवा!] तुझे (तुमचे भगवंताचें) यशचि (कीर्तिच) तारिते 7 ) परि (परंतु) केवळा (नुसत्या त्या ययालाचु), नतारवे (तारवती हीं;). असिला (खङ्गाली) सहायँ (पाठबळ) असे (असेल), तरिच शत्रुला मारवे (मारत); अज्ञहृदयें (मूर्खाचीं अंतःकरणे) भागवत (भगवद्भक्त) न भेटतां (भेटला नाहीं तर), सत्संगति (साधुसमागम) न घडतां (वडला नाहीं तर) तव (तुझ्या) यशोरसीं (यशरूप : रसांत, यशोवर्णनांत) तशी (त्या प्रकारचीं, साधुसंगतीने रंगतात तशीं) न रंगति (रंगत नाहींत, तल्लीन होऊन जात नाहींत). प्रथमचरणार्थः-देवा ! तुमच्या गुणानुवादकीर्तनाने प्राणी तरतात हे तर खरेंच; पण नुसत्या असाहाय गुणानुवाद गाण्यानेच ते तरत नाहीत. त्याला दुसन्याचे म्हणजे सत्समागमाचे साहाय लागते. भगवद्गुणकीर्तनानेच प्राणी तापत्रयापासून मुक्त होत नसून तसे होण्यास त्याला सत्संगतीचे साह्य लागते. याला दृष्टांत खङ्गाचा. ५. पाठबळ; त्या तरवारीची मठ धरणारा कुशल शूरादिसहाय, द्वितीयचरणार्थः–तरवार कितीही पाणीदार असली तरी तिला धरणारा कुशल असेल तरच तिच्याने शत्रूचा नाश होईल. नुसती तरवार काय कामाची? ती आपण होऊन थोडीच शत्रूच्या मानेवर जाऊन प्राण आहे? त्याचप्रमाणे भगवत्कीर्ति जरी पापांचे डोंगर भस्म करिते, तरी त्याविषय कोणी तरी सदुपदेशक लागतो. व्यंग्यार्थः–भगवत्कथाकीर्तनाची मन:पूर्वक आवड बाळगणा-या भक्तास पुढे मार्ग दाखविणारा सद्गुरु भेटतो.