________________
केकावलि. २६९ ब्रह्मांडमष्टादश ॥' तसेच 'देवीभागवत पुराणांत पुराणनामांच्या प्रथमाक्षरांचा उल्लेख पुढील एका श्लोकांत केला आहेः-‘मद्वयं भद्वयं चैव ब्रत्रयं वचतुष्टयं । नालिंपाग्नि पुराणानि कुस्कं गारुडमेव च ॥' या श्लोकावरून मुख्य पुराणांची खालील नांवें निवतातः-(दोन ‘म’) मत्स्य, मार्कडेय, (दोन ‘भ') भागवत, भविष्योत्तर, (तीन ‘ब्र') ब्रह्म, ब्रह्मांड, ब्रह्मवैवर्त, (चार 'व') वामन, वायु, विष्णु, वराह, (नालंपाझि) नारद, लिंग, पद्म, अग्नि, (कुस्कं) कूर्म, स्कंद्, आणि (गारुड) गरुड. “पुराणांचे वर्ग तीन रीतींनीं करितां येतात. पहिली रीति त्यांच्या विशालत्वलघुत्वावरून वर्ग करण्याची. दुसरी त्यांच्या आराध्यदैवतावरून वर्ग करण्याची. तिसरी त्यांच्या सत्वादि गुणावरून. पहिल्या रीतीने पुराणांचे पुराणे व उपपुराणे असे भेद होतात. दुस-या रीतीने मुख्य पुराणांचे वैष्णव पुराणे, शैव पुराणे, शाक्त पुराणे व एतद्भिन्न पुराणे असे चार वर्ग होतात. तिस-या रीतीने मुख्यपुराणांचे सत्वगुणी, रजोगुणी व तमोगुणी असे तीन वर्ग होतात. सत्वगुणी पुराणांत विष्णूचे माहात्म्य फार असते, रजोगुणी पुराणांत ब्रह्मदेवाचे विशेष वर्णन असून तमोगुणी पुराणांत शिवाचें माहात्म्य फार वणिलें आहे. श्रीमद्भागवतांत एकंदर पुराणसंहिता चार लक्ष सांगितली आहे. पुराणग्रंथांची सामान्य सरणी प्रायः प्रश्नोत्तररूपाने असते व विष्णु, शिव व शक्ति हीच पुराणांचीं मुख्य उपास्य दैवतें होत.' (जनार्दनपंत मोडकांचा निबंध.) वर अठरा पुराणांची नांवे सांगितली आहेत त्यांतल्या भागवत व वायुपुराणाच्या ऐवजीं कांहीं स्थळीं देवीभागवत व शिवपुराण ह्या दोहोंची योजना केलेली आढळते. पुराणांप्रमाणे उपपुराणेही अठराच मानिलीं आहेत. तरी त्यांच्या नांवांत पुष्कळ फरक केलेला आढळतो. देवीभागवतांत उपपुराणांची यादी पुढीलप्रमाणे दिली आहे:-सनत्कुमार, नारसिंह, नारदीय, शिव, दुर्वास, कपिल, मानव, औशनस, वरुण, कालिका, सांब, नंदी, सौर, पाराशर, आदित्य, माहेश्वर, भागवत व वशिष्ठ. कित्येक ग्रंथकार यांतील वशिष्ठ, सांब, मानव व शिव या चार उपपुराणांची नांवे गाळून त्या जागीं गणेश, अंविका, मारीच व मुद्गल हीं चार नांवें घालतात. पुराणग्रंथांतून पूर्व युगांतील पुष्कळ गोष्टी सांगितल्या असून त्यांत चातुर्यार्थ नवरसयुक्त अशा लाक्षणिक कथा पुष्कळच सांगितल्या आहेत. ४. साधूच्या सुखानें. अन्वयार्थः-ज्या (ज्या पुरुषाला) शुकोदित पुराण (शुकाचार्याने परिक्षितीस सांगितलेले भागवतपुराण) सन्सुखें (साधूच्या सुखार्ने) साग्री (समग्र, संपूर्णही) श्रवण (श्रुत झाले), [तो] कथा (भगवत्कथा) अतुला (नि ) म्हणेल झणि (कदाचित्) तो आग्रही (पक्षपाती) [असे तुम्ही म्हणाल; मलाचि 7ला मोरोपंतालाच) है (ही कथा) निरुपमा (अनुपमेय) यशोमंडिता (पतितांचा उद्धार केल्यामुळे मिळणाच्या कीर्तीने शोभित अशी) न गमे (वाटत नाहीं) [तर] गुरूसही (तुमचा गुरु जो सांदीपनी त्यालाही) [ती] [निरुपमा यशोमंडिता गमे], स्ववरदा (आपल्याला वर देणाच्या) महापंडिता (भक्तिज्ञानसंपन्न अशाला) [गुरूस पुसा (विचारा). “शुकोदित...कथा' याचा अर्थः-ज्याने साधूच्या मुखाने श्रीमद्भागवत श्रवण केलें तो भगवत्कथा तुलनारहित आहे असाच उद्गार काढील. श्रीमद्भागवतांत भगवत्कथेचे माहात्म्य अतिशय सुरस वर्णिले आहे. ते वाचण्यांत किंवा त्या | २४ मो० के०