Jump to content

पान:बाबुर.pdf/271

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ ४ मोरोपंतकृत तिच्या जळमळे तुळे न शरैदिंदुचे चांदणे, । प्रजा हरिहँरा अशा यदुंदरीं अनेका; कैवी योगसाधनाने जागी झाल्यामुळे जेव्हां पडूचक्रांचे भेदन करू लागते तेव्हां योग्यास प्राणांत वेदना होतात. तेव्हा ह्या हालाहल विषाच्या शमनार्थ तो मनाचा पुत्र चंद्र व सहस्रदळांतून उत्पन्न झालेली त्रिवेणी धारा (गंगा) हीं मस्तकीं धारण करितो. खेचन्यादि मुद्रा धारण केल्यामुळे सर्पभूषणे सहजच त्याच्या अंगावर शोभतात. २. ज्या गंगेचे. यांत कवीनें गंगेचे श्रेष्ठत्व स्थापित करण्याचा यत्न केला आहे. ३. वसति, राहाणे, नांदणूक, अन्वयार्थः‘जिचे (ज्या गंगेचे) नांदणे (राहणें) जगदुरुमहेश्वरप्रभुशिरीं (जगद्गुरु जो शंकर, त्याच्या डोक्यावर) [असे], जिच्या जळमळे (पाण्यावरील फेसाशीं) शरदिंदुचे (शेरदृतूंतील) चांदणे न तुळे (तुळत नाहीं, बरोबरी पावत नाहीं), यदुदरीं (जिच्या । उदरांत) हरिहरा अशा (विष्णु व शंकर यांसारख्या) अनेक प्रजा (पुष्कळ संतति) [आहेत]; कवी (ज्ञाते पुरुष) जशी सुधा (अमृत) तशी काकवी (राब) [असें] भिऊनि (राजाला किंवा इतर दुसन्या अधिका-याला भिऊन) कां म्हणतील (काय म्हणून अभिप्राय देतील)? प्रथमचरणार्थः-ज्या भागीरथीची योग्यता एवढी मोठी आहे कीं त्रैलोक्यपति महादेव याने तिला बहुमानाने आपल्या मस्तकावर धारण केली आहे. १. जळावरील मळाने, जळावरील फेंसाने. द्वितीयचरणार्थः-शरदृतूंतील चांदणे फार स्वच्छ असने; पण भागीरथीच्या उदकावरील फँसाची कांहीं त्याच्याने बरोबरी करवत नाहीं. फेसाची बरोबरी करवत नाहीं मग जळाची बरोबरी कोठून होणार ? गंगेच्या पाण्यावरील फेंस सुद्धां शरदृतूंतील चांदण्यापेक्षा अधिक शुभ्र, मग पाणी अत्यंत शुश्न असेल यांत नवल ते काय? यांत काव्यार्थापत्ति अलंकाराची छटा विरोधाभास अलंकारांत मिसळल्यामुळे दुधांत साखर पडल्याप्रमाणे अलंकारांचा स्वाद वाढला आहे. २.शरदृतूंतील चंद्राचे शरदृतूंत चांदणे स्फटिकासारखें किंवा दुधासारखें अत्यंत शुभ्र असते. कालिदासाने राजाच्या कीर्तिपांडुरत्वाला शरच्चंद्रमरीचिवत्' म्हटलेले आमच्या वाचकांस माहित असेलच. ३. संतति. तृतीयचरणार्थः- ज्या गंगेच्या उदरांत शिवविष्णूसारखी अनेक पराक्रमी मुले आहेत. ज्यांचीं प्रेते गंगेत पडतात अथवा जे सर्वकाळ गंगेत स्नान करितात ते सर्व शिवरूप किंवा विष्णुरूप होतात असे ‘गंगामाहात्म्यां'त सांगितले आहे. पुढील अवतरण पहाः(१) सुकवि म्हणति हरिहरता देसी तू भलतशाहि देहरता.' । [गंगास्तुति-६४ पृ० ५२]- (२) “तुवां केलें प्राणी हरिहर,' असे आयकविते । न मच्चित्ता वेडे करितिल कसे आइ ! कवि ते." ।। [मोरोपंत-गंगास्तव-५]. (३) “मज्जन तव प्रवाही करितां, होतात हरिहर प्राणी.' [मोरोपंत-गंगास्तुति-गीति ४४]. (४) भक्तांसि करिसि हरिहर तूज म्हणति सिद्धि मग न कां ‘जी जी ? [गंगास्तुति-गीति ७७ पृ० ५३]. (५) 'कैलासी वैकुंठीं हरिहर तव तोय करुन दे वसती.' ।।१० [मोरोपंत-गंगाप्रार्थना] ४. हरि (विष्णु), हर (शंकर) यांसारख्या. ५. यत्+उदरीं= जिच्या पोटांत, अर्थात् ज्या गंगेच्या पोटांत. ६. ज्ञाते, सुज्ञ पुरुप. प्रथम तीन चर