Jump to content

पान:बाबुर.pdf/265

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५८ मोरोपंतकृत अभीष्ट वरितात, जे तव कथेसि विश्वसती; भली असुरवंचनी, श्रुत असेचि विश्वास ती; । कथा कशि सखी तिची ? ठुकवुनी हरी संचितें, तरी अमृत दे, असे संदय, दाखवी 'वंचितें. ॥ १०९ १. प्रास्ताविकः-मोहिनीपेक्षां कथेची योग्यता मोठी आहे असे दर्शवून त्यांच्यावंचनेत (फसवण्यांत) महदंतर आहे असे वर्णित होत्साते कवि म्हणतात. अन्वयार्थः-‘जे (लोक) तव (तुझ्या) कथेसि (कथेला, कथेवर) विश्वासती (विश्वासतात, विश्वास ठेवतात) [ते] अभीष्ट (इच्छित मनोरथ, मनकामना) वरितात, (प्राप्त करून घेतात); मोहिनी] भली (पक्की) असुरवंचनी (दैत्यांस ठकविणारी) [ह्याप्रमाणे] ती विश्वास (जगास त्रिभुवनास) श्रुत असेचि (ठाऊक आहेच); कथा तिची (मोहिनीची) सखी (सोबतीण) कशी (कशाची)? [भगवत्कथा] ठकवुनी (फसवून) संचितें (संचितक, सांचविलेली पापपुण्यांचीं क) हरी (हरण करिते, त्या कर्मांचा नाश करून त्यांस संसारदुःखापासून सोडविते), तरी (तथापि) अमृत (मोक्ष) दे (देते), सदय (दयाळु पुरुष) वंचित (वंचना करून, फसवून) असे (ह्या प्रकारचे कल्याण) दाखवी (दाखवितो). प्रथमार्धाचा अर्थः–जे भगवत्कथेवर आपल्या उद्धाराविषयीं विश्वास ठेवितात त्यांचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात. पण तशी गोष्ट मोहिनीची नाहीं. मोहिनीने आपल्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणाच्या दैत्यांस फसविले; ही गोष्ट त्रिभुवनांतील सर्व लोकांस माहित आहेच. २. विश्वासतात, विश्वास ठेवितात. ३. दैत्यांस फसविणारी; त्यांना अमृताची आशा लावून ते न देणारी. ४. जगास, त्रिभुवनास. ५. त्या मोहिनीची. ६. फसवून. ७. (मोहिनीपक्षी) संचित धने, (कथापक्षीं) पूर्वजन्मार्जित संचितकमैं. द्वितीयार्धाचा अर्थः-ाल्यावर विश्वास ठेवणाच्या लोकांचे मनोरथ पूर्ण करणारी भगवकथा व विश्वास दाखवून फसविणारी मोहिनी या दोघींची योग्यता सारखीच कशी बरे होईल? होणार नाही. म्हणून मोहिनीपेक्षां भगवत्कथा निःसंशय श्रेष्ठ, आतां भगवत्कथा ही आपल्या भजकांस एका प्रकारे फसविते खरी, पण तिच्या फसविण्यांत व मोहिनीच्या फसविण्यांत जमीनअस्मानाचे अंतर आहे. भगवत्कथा देखील आपल्या भजकांची पूर्वजन्मार्जित कर्मे त्यांना कळू न देता त्यांच्यापासून हिावन घेऊन त्यांचा नाश करिते, पण इतके केले तरी ती त्यांना अमृत (मोक्ष) देते. मोहिनी आपल्या भजकांस ठकवून त्यांची संचित (संचित धने) हरण करिते, पण ती त्यांना अमृत (सुधा) देत नाही. यावरून भगवत्कथा जरी आपल्या भजकांस वरविते तरी अशा रीतीने ती त्यांचे कल्याणच करिते. यावरून कवि एक साधारण नियम सांगतात. दयाळु पुरुष दुसन्याला फसवून सुद्धा त्याचे कल्याणच करितो म्हणजे दुसन्याचे कल्याण करण्याकरितांच दयावंत पुरुषाला फसवणूक करावी लागते. ८. सुधा, मोक्ष. मोहिनीपक्षी सुधा; कथापक्षी मोक्ष. ९. दयायुक्त, दयालु, कृपावंत.