________________
केकावलि. २१३ न जें प्रिय, सदोष तें; प्रिय सदोषही चांगलें; | स्वतोक पितरां रुचे, जरिहि कर्दम रांगलें. । ठुलाचि धरि पोटिशीं कशि तदा यशोदा बरें ? जरी मळविशी रजोमलिनकाय तू अंबरें. ॥ | ८६ १. प्रास्ताविकः-मागील केकेंत स्वकीय दोषाविषयी प्रभूची दुर्लक्षता दाखविली, तोच भाव दृष्टांतांतरांनी कृष्णावतारलीलाकथएडारा सांगतात. अन्वयार्थ.-जें (जी वस्तु) प्रिय न (आवडती नाहीं, आवडत नाहीं) ते (ती वस्तु) सोप (दोषयुक्त) [दिसते] [तसेच] प्रिय (जी वस्तु आवडती आहे) सदोषही (ती जरी दोषयुक्त असली तरी) चांगलें (निर्दोष अशी दिसते); स्वतोक (आपलें मूल. पोटचे पोर) जरीहि कर्दम (चिखलांत) रांगले [तरी तें] पितरां (आईबापांना) रुचे (आवडते). जरी तुं रजोमलिनकाय (धुळीने ज्याचे अंग भरले आहे असा) अंबरें (यशोदेची वस्खें) मळविशी (मळवीत होतास) [तरि] तदा (त्या वेळेस) यशोदा तुलाचि पोटिशीं कशी धरी बरें ? प्रथमचरणार्थः–जी वस्तु आपणास आवडत नाहीं तिला कांहीं तरी दोष लावावयाचा व आपणास आवडत्या वस्तूंत दोष जरी असला तरी तो गुणच भासावयाचा, ही जनाची रीतिच आहे. याला दृष्टांत पुढल्या चरणांत देतात २. आपलें मूल. ३. आईबापांना. द्वितीयचरणार्थः-पोटचे पोर चिखलात रांगून चिखलाने भरले असले तरी ते स्वतः आईबापांना गोडच वाटते. स्वतःचे मूल कितीही कुरूप असले किंवा त्याचे आंग धुळींत भरल्यामुळे ते कितीही घाणेरडे असले तरी आईबापांना ते प्रियव असते. याला संस्कृतांत ‘नापिकपुत्रन्याय' ह्मणतात. एका राजाने एका नापिकाला एक अत्यंत सुंदर मुलगा आणावयास सांगितले असता त्याने आपल्या कुरूप मुलालाच अत्यंत सुरूप समजून राजापुढे नेले तेव्हां राजाला त्याचे आश्चर्य वाटलें व रागही आला. पण स्वत:चा मुलगा आईबापांस अत्यंत कुरूप असला तरी अत्यंत सुरूपच वाटतो ह्मणून न्हाव्याकडे बिलकुल दोष नाहीं अशी प्रधानाने राजाची समजूत करून राग दूर केला. अशी ह्या न्यायासंबंधी कथा आहे. म्हणूनच कालिदासाने शाकुंतलांत ‘धन्यास्तदंगरजसा मलिनीभवंति. ह्मणजे ‘ज्या आयांची वस्त्रे पोरांच्या अंगावरील धुळीने मलिन होतात त्या धन्य होत,' असा उदार काढिला आहे. ४. देवा! (कृष्णावतारीं) स्वतः तुम्हांलाच. ५. पोटाशीं. ६. व्रजपति नंद त्याची भार्या व कृष्णमाता. ७. धुळीने भरले आहे अंग ज्याचे. प्रास्ताविकःआपले मूल चिखलांत भरून घाणेरडे झाले तरी ते आईबापांना चांगलेच वाटते या सामान्योक्तीच्या स्पष्टीकरणाथ कवीने येथे प्रत्यक्ष भगवंताच्या लीलावतारचरित्रांतीलच एक उदाहरण दिलें आहे. द्वितीयार्धाचा अर्थः-देवा ! कृष्णावतारीं धुळीने ज्याचे अंग मळलें आहे असा तू जरी यशोदेची वस्त्र मळवीत असस, तरी तुला यशोदा किती प्रेमानें पोटाशीं घेत होती बरें ? व्यंग्यार्थः-तेव्हां ज्याला एकदा आपलेसें ह्मटले तेव्हा त्याने कितीही अपराध केले तरी त्याला पोटाशी धरून त्याच्यावर अनुग्रह करणे हेच आपणास योग्य आहे असे कवि यांत