________________
मोरोपंतकृत लेशहि न विसरले, यमनियमांतें सदैवही जपले. ॥ १६ ॥ त्या सुरतपःप्रभावे जे दानवदार सर्वही भ्याले । बहु कामादिपरिग्रह तृष्णादिक दीन तेधवां झाले. ॥ १७ ।। केवळ दुर्बळ होता क्षीण न उरलीच शक्ति कांहींच । ते पावले अदर्शन झाले दानव समस्त नाहींच. ॥ १८ ॥ ते गुप्त अंतरिक्षी झाले मायाबळे असुरभूप । हृदयाकाशी वसले होउनियां लीन वासनारूप. ।।१९।। परिपाककाळ येतां योगाचा देवशत्रु बाधाया । बसले जपत सुदारुण मायावी ते स्वकार्य साधाया, ॥ २० ॥ ऐसे होत गेले सुर शरण हरालयासि योगाच्या । विजयी झाल्या असतां क्षीणा त्या वासना कुभोगाच्या. ॥ २१ ॥ अधिकारी संसारी होउनि उद्विग्न निर्गुणस्थानीं । ज्या प्राप्त होय हृदयाकाशीं तेथेंचि लागले ध्यानीं. ॥२२॥ सिद्ध महादेव प्रभु झाला ते सुर भयांत ताराया ।। अभिमत उपासकांतें होय अविद्याश्रमासि वाराया. ॥ २३ ॥ त्रिपुरासी युद्ध करी त्र्यक्ष सशरधनु धरूनि अतिसत्व । विद्वान् प्रणवीं योजुनि चित्त करी कोशभंग हे तत्व. ॥ २४ ॥ त्र्यसें शरसंथाने दैत्य सकल भिन्नदेह ते केले । स्थूळाध्यास उडवितां ध्याने कामादि नष्टतनु ठेले. ॥२५॥ रात्रींत प्रबळ असुर होउनि देवांसि जिंकिती शूर । कामादि बळि स्वप्नीं, होति शमादिक तयापुढे चूर. ॥ २६ ॥ कीं शुक्रे आप्यायित केले ते दैत्य सर्वही हव्यें । पाखंडमार्ग सेवुनि कामादि प्रसरती बळे नव्यें. ॥ २७ ॥ दिव्यरथस्थित शंकर गर्जुनि दैत्यांसि संगरीं दापी । सूक्ष्म शरीर अधिष्ठुनि योगी मर्दी स्मरादि जे पापी. ॥२८॥ देवांनी सिद्धांनीं वहु तो शंकर वृषध्वज स्तविला । योगजधर्मसमुच्छित म्हणति वृषध्वज म्हणोनि या कविला. ॥ २९ ।। असुरांहीं नानाविधशस्त्रांहीं सरथ पाडिला रुद्र । योगी सूक्ष्मशरीरीं तो विघ्नं पीडिला, जसा क्षुद्र. ॥ ३० ॥ स्तुति होतां गर्वे जो सुस्थित झालों असें मनीं मानी । त्या योग्याते सूक्ष्म देहींही प्राप्त होतसे हानी. ॥ ३१ ॥ शंकर तेव्हां कुंठितगति होय शकट जसे पथीं भग्न । कीं त्या लयांधकारामध्ये योगींद्र जाहला मग्न, ॥ ३२ ॥ ऐसे होतां विप्न, प्रकटे वृषरूप विष्णु रक्षाया । कीं तो शंकर भजला होता त्रितरक्षणैक, दक्षा या. ॥ ३३ ॥ हा धर्म तमोमझा जीवांतें उद्धरावया दक्ष । येणेंचि समुद्धरिले स्वाश्रित पावोनि संकटीं लक्ष'. ॥३४॥ धर्माने चेतोरथ उद्धरून, लिंगभूमी जिंकून, योग्याला महतत्व नांवाच्या प्रदेशांत नेले. तेथेही असुर त्रास देऊ लागले. तेव्हां रुद्र धनुष्यीं अग्नि स्थापूनि दिव्य शर जोडी । त्या दैत्याच्या तिस-या नगरीं ब्रह्मास्त्रयुक्त मग सोडी. ॥ ३५ ॥ अग्नि महावाक्य, धनु प्रणव, चिदाभास होय दिव्य शर, । ब्रह्मास्त्र चरमवृत्तिहि, पुर मूळाज्ञान, म्हणति सुज्ञ वर• ॥ ३६ ।। कल्याणकरें जीवें असुरपुरें जागृदादि जी तीन । सद्विद्यास्त्र केलीं भस्म असे वर्णिती सुधी जीन• ॥ ३७ ॥ या त्रिपुराच्या दाहीं सद्धर्मचि मुख्य कारण स्पष्ट । स्तुति शंकरादि करिती हाचि महाविष्णु चुकवितो कष्ट. ॥ ३८ ॥ ज्ञानेश्वरींत ज्ञानोबारायांनी १७ व्या अध्यायाच्या प्रारंभीं ह्या रूपकाचा अमळ निराळ्या त-हेने उल्लेख केला आहे. तो असाः-‘विश्वविकासित मुद्रा । जया सोडवी तुझी योगनिद्रा । तथा नमोजी गणेंद्रा । श्रीगुरुराया ! ॥ १ ॥ त्रिगुण त्रिपुरीं वेढिला । जीवत्व दुग आडिला । तो आत्मशंभूने सोडविला । तुझिया स्मृती' ॥ २ ॥ यांत ( सत्व, रज, तम ह्या त्रिगुणासच त्रिपुरें ह्मटले आहे. त्रिगुणांनीं त्रासलेला जीवात्मा सद्गुरुस्मरण वा आत्मशंभूने सोडविला हा भावार्थ. ४. मुरदैत्याचा नाश करणारा. (वि) कथासंदर्भः- मुर हा कश्यपाला दनूनामक पत्नीपासून झालेला पुत्र. ह्यान । शिवाने किंवा आ ११ पलापासून झालेला पुत्र. ह्याने देवांनी ति