Jump to content

पान:बाबुर.pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८४ मोरोपंतकृत दिलें अमृत पन्नगा, तशि खळी कृपा त्रासदा. ।। ६९ अतिप्रिय, सुखप्रद्, पॅथम तू मुंदंभोद या मयूरहृदया; तुझी क्षण विटो न शंभो ! दया; । । १. दूध. चतुर्थचरणार्थः–सर्पाला दूध जरी पाजले तरी जसा तो आपलें दुष्टत्व टाकीत नाहीं त्याप्रमाणे खळावर (दुष्ट मनुष्यावर ) केवढी जरी कृपा केली तरी ती त्रास देणारीच होते. पंतांनीं 'नामसुधाचषकांत, असाच उद्गार काढला आहे :‘दुग्धप्रदासि निर्विष होइल मुख काय काद्रवेयाचें ? [नामसुधाचषक-गी० ८६ पृ० ३२०.] अमक्या मनुष्याने आपल्याला दूध पाजलें म्हणून त्याला आपण चावू नये असा विचार जसा सर्पाच्या डोक्यात कधी येत नाहीं त्याप्रमाणे दुष्ट मनुष्यांवर कितीही उपकार केले तरी ते आपल्या जातीवर जाऊन उपकार करणान्यावर शस्त्र उपसण्यास कधीं मागे पुढे पाहावयाचे नाहींत. म्हणून दुष्टावर केलेली कृपा त्रास दे णारी होते, यास्तव तसे कधीं करू नये. २. सर्पाला. व्यु०:- सर्प पायांनी चालत नसून पोटाने सरपटत जातो म्हणून त्याला पन्नग म्हणतात. [ पन्नं पतितं यथा तथा गच्छतीति पन्नगः.] ३. अन्वयः- [ हे 1 सुदंभोद! तू प्रथम या मयूरहृदया सुखप्रद [ आणि ] अतिप्रिय [ आहेस ], शंभो! तुझी दया [ या मयूराला] क्षण न विटो; [म्यां ] उदारपण वानिले; अजि! [ महाराज!] पहा, हे निपटे साबळ लेकरू बळे गुरूपहासा कसें करील? प्रास्ताविकः- मागल्या दोन कैकांत शिवाच्या सत्पात्री दानाचे एक व असत्पात्री दानाचे एक अशी दोन उदाहरणे दिली आहेत, त्यावरून शिवास राग आला असेल अशी कल्पना करून कवि या केकांत त्याचे समाधान करितात. ४. सुख देणारा. ५. अगोदरच. ६. सुद् (आनंद)+अंभाई (मध. अंभस्-जल, द-देणारा)=आनंदरूप जल देणारा मेघ. प्रथमचरणाचा अन्वयाथः- तू मुदंभोद (आनंदरूपी जल देणारा मेघ ) या मयूरहृदया (मोराच्या अंतःकरणास, पक्षी, मोरोपंतकवीच्या अंतःकरणास ) प्रथम (प्रथमपासून, अगोदरच ) अतिप्रिय (अत्यंत प्रियकर ) सुखप्रद (सुख देणारा) [आहेस.] १. सुदभोद' हे संबोधन मानले तरी प्रशस्तच. स्वभक्तांस स्वर्गसुखापासून मोक्षापयेत सर्व सुखें प्राप्त करून देणान्या आनंदघना शंभो ! आपण या मयूराच्या हृदयाला पहिल्यापासूनच सुख देणारे म्हणून अत्यंत प्रियकर असे आहात. श्लेषःयेथे ‘मयूर'शब्दावर कवीने श्लेष योजिला आहे. हा श्लेष पंतांच्या काव्यांतून शेकडों प्रसंगीं योजिलेला आढळतो. मेघ पाहून मोराचें मन आनंदित होऊन तो नाचू लागतो, ह्या सृष्टिचमत्कारापासून कवींनीं देवभक्तसंबंध दाखविण्यास ही मेघमयूरांची उपमा फार समर्पक म्हणून योजिलेली दिसते. ७. मोराच्या अंतःकरणास; पक्षीं, भक्त मोरोपंत याच्या अं करणास. ६८. महादेवा! [हे] शंभो ! तुझी दया ( कृपा ) क्षण (क्षणभर न होवो. 3 ने विटो (कंटाळो )=माझ्यावरील तुझी दया क्षणभर देखील कमी ==