________________
| १८२ । मोरोपंतकृत तया करिं तुम्हीच द्या मैदनमारक ! क्षीरधी; । असे तीन अर्थ होतात. व्यु:-'कुमार' शब्दाला क्षुद्रार्थी के प्रत्यय लागून कुमारक= लहान मुलगा, अथवा गरीब मुलगा अशा अर्थाने हा शब्द झाला आहे. कथासंदर्भःउपमन्यु हा वसिष्ठकुलोत्पन्न व्याघ्रपाद नामक ऋषीचा ज्येष्ठपुत्र होय. हा लहानपणी एकदा दुस-या एका समवयस्क ऋषिपुत्राबरोबर खेळत खेळत त्याच्या घरी गेला. तेथे त्या मुलाच्या मातेने आपल्या पुत्राबरोबर यालाही क्षीरपान करविलें. घरी आल्यावर हा आपल्या मातेजवळ गोरस मागू लागला. तेव्हा तिने गरीबीस्तव नित्यनेमाप्रमाणे पीठ पाण्यांत कालवून त्याला दिले. पण ते न घेतां अमक्याच्या आश्रमांत मी दूध प्यालों तसे दूध मला दे असे तो म्हणू लागला. हें पुत्राचे भाषण ऐकून माता फार खिन्न झाली व तसे गोरसपान करण्याचे तुझ्या नशीबी नाही, कारण तुझे तसे पूर्वसुकृत नाही' असे म्हणाली. तेवढ्यावरून यानें वनांत जाऊन शंकराची आराधना केली. याची उत्कट भक्ति पाहून शंकर इंद्ररूपाने वर देण्यास याजवळ आले व याला वर मागण्यास सांगितले. त्यावर शंकराशिवाय इतर देवतांपासून वर मागण्याची माझी इच्छा नाहीं, शंकरांनी मला लहान वर दिला तर तो इंद्रा! मला तुझ्या मोठ्या वराच्या शतपट योग्यतेचा वाटतो. ह्मणून मला शंकराच्याच दर्शनाची इच्छा आहे, तू स्वस्थानाप्रत जा.' असे याने इंद्ररूपधारी शंकराला झटलें. असा याचा ‘सुदृढ निश्चय' पाहून शंकर प्रसन्न झाले व त्यांनी याला कल्पपर्यंत आयुष्य तसेच समग्र क्षीरसागराचे आधिपत्य हे वर दिले. याची कथा महाभारतांतर्गत अनुशासननामक पर्वत आहे. ज्ञानेश्वरीत एका ठिकाणी ज्ञानोबाराय लिहितात:-‘मागां दूध दे ह्मणितलियासाठीं । आघविया क्षीसब्धिची करूनि वाटी । उपमन्यूपुढे धूर्जटी। ठेविली जैसी’ ॥ (ज्ञानेश्वरी १०-१७.) ६. क्षीर (दुधाच्या ठिकाणीं) धीः (बुद्धि) यस्य (ज्याची) सः (तो) क्षीरधीः= दुग्धप्राप्तीविषयीं ज्याला इच्छा झाली आहे असा. १. त्याच्या हातांत, त्याच्या स्वाधीन. २. मदनांतका! शंकरा! कथासंदर्भःएकदां हिमाचलावर शिव ध्यान करीत बसले असून नगकन्या पार्वती त्याची सेवा करीत असतां तेथे शंकरपार्वतींचे ऐक्य करावे ह्या हेतूने इंद्रादि देवांच्या आज्ञेवरून वसंतासह कामे आला व त्याने आपले पुष्पबाण शंकरपार्वतींवर मारण्याचे सुरू केले. मदनबाणांच्या अनिवार मा-यामुळे पार्वती कामातुर होऊन शंकराला बिलगू लागली व प्रत्यक्ष शंकराच्या मनाचीही चलबिचल व्हावयास लागली. असे एकाएकी होण्याचे कारण काय हे पहाण्याकरितां बांकराने आपले डोळे उघडले. तों वसंतासह काम त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा आपल्या तपास यानेच विघ्न केले असे जाणून शंकराने आपला भालप्रदेशस्थ तृतीयनेत्र उघडून त्याचे भस्म केलें. शिव व मदनदाह-गूढ रूपक–शिवाविषयी पुष्कळ रूपके आहेत. त्यांत ज्ञानी पुरुष हाच शिव किंवा शंकर असे पुराणांतून कांहीं स्थळीं वर्णिले आहे. अन्यस्थळीं आत्म्याला, किंवा परमात्म्यालाही शिव म्हटले आहे. जीव अथवा अंतरात्मा यांच्यात अनेक वासना नी असतात. तो आपल्या स्वरूपस्थितीकडे लक्ष्य देत नाही म्हणून त्या वासना १ अशान राहते त्या अज्ञानांत बीजांत अनुद्धत. वृक्ष तशा राहातात व },