Jump to content

पान:बाबुर.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| १७६ मोरोपंतकृत प्रसाद मग काय तो? जरि निवारिना लाघवा ? कसे देशमुखानुजा विसरलां ? अहो ! रौघवा! ।। ६६ १. लघुपणाला, कमीपणाला. तृतीयचरणार्थः-जो शरणागताचा कमीपणा दूर करून त्याची योग्यता वाढवीत नाहीं तो कशाचा प्रसाद? म्हणजे त्याला प्रसाद म्हणणे योग्य होणार नाहीं. सुंदर व समर्पक व्याख्याः-ह्या केकेंत पंतांनी प्रभुत्व व प्रसाद ह्यांच्या ज्या व्याख्या दिल्या आहेत त्या किती तरी सुंदर आहेत? अशा प्रकारच्या समर्पक व्याख्या पंतांच्या काव्यांत वन्याच ठिकाणी आढळतात व त्यामुळे त्यांचे रमणीयत्व आणि आकर्षकत्व हीं फारच वाढली आहेत. पुढील थोडींच उदाहरणे पहाः-(१) धर्मन्यायोचित जें तेंचि सुभाषण मनासि उद्धव दे। [विराट०-४ गी० ५३ ], (२) वापा ! प्रजा अशी जी पितरांसि भवार्णवांत सुतरी ती [आदि०-अ० २३ गी० ११], (३) शोकीं पडल्या चित्ता दे बोधकरासि तो सखा लोकीं [कृष्णविजय-उत्तरार्ध-अ० ८२ गी० २६], (४) ती दया दृदयीं रोधी क्रोधाचा नित्य वेग जी [रामायण], (५) उदारपण ते भलें सुखवि जें सुपात्रा सदा [केका ६९]. २. रावणाच्या धाकट्या बंधूला (बिभीषणाला). ऐतिहासिकः–ब्रह्ममानसपुत्र पुलस्त्य ऋषीला विश्रवा नामक पुत्र होता. त्याला देववर्णिनी व कैकसी अशा दोन स्त्रिया होत्या. पहिलीपासून त्याला वैश्रवण (कुबेर) झाला व दुसरीपासून रावण, कुंभकर्ण, शूर्पणखा व बिभीषण अशीं चार अपत्ये अनुक्रमे झाली. रावणाला जन्मतःच दहा शिरें होतीं. चार भावंडांमध्ये बिभीषण तेवढा सत्वगुणी होता. रावणाने सीताहरण केले ते याला न आवडून याने त्याला पुष्कळ बोध केला. तो रावणास न आवडून त्याने याची पुष्कळ निर्भत्सना केली. तेव्हा हा चार प्रधानांस बरोबर घेऊन रामास शरण गेला. रामाने याचे अंतःकरण ओळखून त्यास आश्रय दिला व रावणास मारून लंकाराज्याचा तुला अभिषेक करीन असे अभिवचनही दिले. पुढे रावणवधानंतर रामाने लक्ष्मणाकडून याला लंकाराज्याभिषेक करविला. रामाची याजवर इतकी कृपा होती कीं ते त्याला आपल्या बंधूप्रमाणे समजत. आपल्या शरणागताचे दैन्य दूर करून त्याला प्रभूने आपल्या योग्यतेस चढविले याचे उदाहरण चवथ्या चरणांत दिले आहे. ३. रघुकुलोत्पन्ना रामचंद्रा ! ऐतिहासिकः-रघु हा इक्ष्वाकुकुलोत्पन्न ऐलविल दिलीपचा पौत्र व दीर्घबाहु राजाचा पुत्र. हा सूर्यवंशांत इतका प्रख्यात होऊन गेला कीं, सूर्यवंश हे नांव बरेच मागे पडून रघुवंश असे नांव चालू झाले. यास अजनांवाचा एक पुत्र होता' (भारत. प्रा. ऐ. कोश). कविकुलगुरु कालिदास ह्याने आपल्या प्रसिद्ध रघुवंशकाव्यांत रघु हा दिलीपराजास सुदक्षिणा भार्येपासून नंदिनीनामक वशिष्ठधेनूच्या प्रसादानें झालेला पुत्र होय असे वर्णिले आहे. रघूच्या वंशांत झालेले राजे ते राघव. परंतु हे नांव दाशरथिरामाविषयी योजण्याची विशेष रूढी आहे. चतुर्थचरणार्थः-देवा! रामावतारी आपल्यास पण शरण आला तेव्हां तो शत्रूचा बंधु, ही गोष्ट लक्षात न घेतां पण त्यावर त्याला आपला बंधु मानून त्याला आपल्या योग्यतेस चढविलें ही गोष्ट जरला? बिभीषणावर प्रसाद करून जसे तुम्ही त्याला आपल्या यो आपण कशी विसरलो ? विभीषणावर प्रसाद करून