________________
केकावलि. १६९ शस्त्र अथवा गोळे भलता प्रकार । परिसीं संस्कार सकळही हेम ।। २ ।। महापुरी जैसे जातसे उदक । मध्ये ते तारक नाव जैसी ।। ३ ॥ तये नावेसंगे ब्राह्मण तरती। केंवि ते बुडती अनामिक ।। ४ ।। नाना काष्टजात पडतां हुताशनीं । ते जात होऊनि एकरूप ।। ७ ॥ तेथे निवडेना बुरे की चंदन । तैसा वर्णावर्ण नामीं नाहीं ।। ५ ।। नामामृतें झालें मुळींचे स्मरण । सहज साधन तुका म्हणे ॥ ६ ॥ (८) ब्राह्मण तो याती अंत्यज असतां । मानावा तत्वता निश्वयेसीं ॥ १ रामकृष्णनामें उच्चारी सरळे । आठवी सांवळे रूप मनीं ॥ २ ॥ शांति क्षमा दया अलंकार अंगीं। अभंग प्रसंगी धैर्यवंत ॥ ३ ॥ तुका म्हणे गेल्या पडऊमी अंगें । सांडुनियां मग ब्रह्मचि तो ।।४।। (९) ब्राह्मण तरि एक नरहरि सोनार । ज्यासाठी शंकर माथां राहे ।। १ ।। ब्राह्मण तरि एक सजना कसाई । चक्रधारी गृहीं मांस विकी ॥२॥ तुका म्हणे ब्रह्म जाणे तो ब्राह्मण। येरातें नमन करा परतें ॥ ३ ॥ (१०) ब्राह्मण ते कोण म्हणावें कोणासी । सांगावे आम्हांसी कृपानिधी ।। १ ।। वेदाचे वचन आठउनी मनीं ! बोलावी ते वाणी सत्यंजय ।। २ ।। असत्य बोलतां पूर्वजां दूषण । पहा विचारून श्रुतीमध्ये ॥ ३ ।। अंघोळी ती धोत्रे लेतां आभरण। काय इतर जन न करिती ॥४॥ टिळे माळा मुद्रा नित्य करी लान । नव्हती ब्राह्मण निश्वयेसीं ॥ ५ ॥ बाबाजीसद्गुरुदास तुका म्हणे । पुढील कारण सांगों आतां ।। ६ ।। (११) सोनियाचे श्वान भाळींचा मुगुट । एकचि कनक मोलें घेता ॥ १ ॥ दुध तापविलें सोनियाचे भांडीं । मातिचिये हांडीं स्वाद एक ।। २ ।। ऊंसाचा परिपाक शूद्रे गुळ केला । ब्राह्मणी रांधिला स्वाद एक ।। ३ ।। गाईचि जाती असती नानावर्ण । दुधा शुभ्रपण सारिखेंचि ॥ ४ ॥ तुका म्हणे ऐसा भावार्थ कारण । जाती थोर, हीन नाहीं देवा ॥ ५ ॥ (१२) उत्तम त्या याती । देवा शरण अनन्यगती ॥ १ ॥ नाहीं दुजा ठाव । कांहीं उत्तम मध्यम भाव ॥ २ ॥ उमटती ठसे । ब्रह्मप्राप्ति अंगीं दिसे।। ३ ।। भाविक विश्वासी । तुका म्हणे नमन त्यांसी ॥ ४ ॥ (१३) अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड। काय त्यासी रांड प्रसवली ॥ १ ॥ वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभयतां कुळयाती ॥ २ ॥ ऐसा हा निवाडा झालासे पुराणीं। नव्हे माझी वाणी पदरची ॥ ३ ॥ तुका म्हणे आगी लागो थोरपणा दृष्टि त्या दुर्जना न पडो माझी ॥ ४ ॥ (१४) पवित्र ते कुळ पावन तो देश । जेथे ह . घेती जन्म ।। १ ।। कर्म, धर्म त्याचे झाला नारायण, त्याचेनि पावन तिन्ही लोक ।।.. वर्णअभिमानें कोण झाले पावन । ऐसे द्या सांगून मजपाशीं ।। ३ ।। अंत्यजादि योनि तरल्या हरिभजनें । तयांचीं पुराणे भाट झाली ॥ ४ ॥ यातायाती धर्म नाहीं विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्रीं ।। ५ ।। तुका म्हणे तुम्हीं विचारावे ग्रंथ । तारिले पतित नेणों किती ॥ ६ ॥ - (१५) 'हृदया स्मर त्यांसि, असो श्रीभगवद्भक्त जाति भलती बा' (सन्मणिमाला-गी० ९७ ८, | १३), (१६) “परिस अयाचा उडवी सद्भाव, तसाच भक्त यातीस’ (तुकारामस्तुति-गी, ३, पृ० २७). त्याचप्रमाणे श्रीमद्भागवत एकादशस्कंध, शेखमहंमदकृत ‘योगसंग्राम' एकनाथी वगैरे ग्रंथांत हेच तत्व प्रतिपादिले आहे. तसेच इतर अवचीन संतांचीही याविषयी वचने आहेत ती त्यांच्या ग्रंथांत शोधक वाचकांस सांपडतील.७.) तिळमात्र की क