पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

  • पायरी १४. ग्रामपंचायतीच्या पातळीवरील जैवविविधता

व्यवस्थापन कृति आराखडा बनवणे व त्याच्या आधारे रोहयोसाठी रोजगाराचे नियोजन पक्के करणे

  • पायरी १५. सामूहिक वनसंपत्तीचे पुनरुज्जीवन व

व्यवस्थापन हाती घेणे वनाधिकार कायद्यानुसार वनहक्क धारकाची कर्तव्ये पुढील प्रमाणे आहेत: क) कोणत्याही वन हक्क धारकाने वन्य जीवन, वन व जैविक विविधता यांचे संरक्षण केले पाहिजे. ख) कोणत्याही वन हक्क धारकाने लगतची पाणलोट क्षेत्रे, जल स्त्रोत व परिस्थितीकदृष्ट्या अन्य संवेदनाक्षम क्षेत्रे पुरेशी संरक्षित आहेत याची सुनिश्चिती केली पाहिजे. ग) कोणत्याही वन हक्क धारकाने वननिवासी अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी यांचे निवासस्थान, यांच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारसाला कोणत्याही प्रकारे बाधा पोहोचेल अशा कोणत्याही प्रकारच्या विघातक प्रथांपासून सुरक्षित ठेवले असल्याची सुनिश्चिती केली पाहिजे. । घ) कोणत्याही वन हक्क धारकाने सामूहिक वन संसाधनांच्या वापराचे नियमन करणे आणि वन्य प्राणि, वन व जैविक विविधता यांवर प्रतिकूल परिणाम करणारी कोणतीही कृती थांबविणे यांच्यासाठी ग्रामसभेने घेतलेले निर्णय पाळले जात असल्याची खात्री करून घेतली पाहिजे. ही कर्तव्य बजावण्यासाठी ग्राम समाजांनी आता पुढे सरसावले पाहिजे.

  • पायरी १६. सामूहिक वनसंपत्तीतील काही भागावर

सुरक्षावन प्रस्थापित करून तेथे नैसर्गिक जीवसृष्टीचे पुनरुज्जीवन करणे अशा कर्तव्याचा एक महत्वाचा भाग म्हणून ग्रामसमाज त्यांच्या एकूण अधिकार क्षेत्रातील, विशेषतः सामूहिक वनक्षेत्रातील ५-१०% भूभाग अथवा जलभाग पूर्णपणे संरक्षित करून तेथे नैसर्गिक जीवसृष्टीचे पुनरुज्जीवन होण्यास प्रोत्साहन देऊ शकतील. असे देशभर होऊ शकले, तर त्याने निसर्गसंरक्षणाला मोठा हातभार लाभेल. आमच्या