पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सरपण गोळा करणारे (स्त्रिया, मुली) क. सध्याच्या पध्दतीचा अभ्यास करणे – कोणती झाडे-झुडुपे सरपणासाठी चांगली, बाजारपेठ, आर्थिक उलाढाल, उपजिवीका यांचा अभ्यास व संशोधन करणे ख. जंगलाचा नाश न करता सरपण काढण्याची पध्दती विकसित करणे ग. सरपणासाठी पर्यायाचा – सौरऊर्जा, निर्धर चूल - शोध घेणे घ. चांगल्या सरपणाच्या झाडांची बी-बियाणे गोळा करणे च. चांगल्या सरपणाच्या झाडांची नर्सरी तयार करणे छ. सरपणासाठी स्वतंत्र प्लॉट, झुडुपी जंगल राखणे व विकसीत करणे ज. आर्थिक व्यवस्था करणे गायरान कसणारे समूह क. या समुहाचा इतिहास –सामाजिक चळवळ इत्यादी विषयी लिखाण ख. या समुहाचा आर्थिक सामाजिक इतिहास लिहिणे, अभ्यास करणे - उपजिवीके संदर्भात ग. मालकी हक्क (नवरा-बायकोच्या नांवे) मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करणे घ. गावरान बी-बियाणे बँन्क उभारणे च. बांध-बंदिस्ती करणे छ. बांधावरील व शेतातील झाडांची लागवड जोपासना करणे ज. पाणी व्यवस्था करणे