पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ह्याबरोबरच कोणत्याही गावाच्या सामूहिक वनसंपत्तीवर बाहेरचे लोकही अवलंबून असतील व त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव पडत असेल. उदाहरणार्थ, मेंढा लेखा गावाच्या क्षेत्रातून बाहेरच्या ८ गावांतील लोक वनोपज गोळा करतात. तसेच बल्लारशा शहरातील कागद गिरणी या क्षेत्रातील बांबूवर अवलंबून आहे. त्या गिरणीचे कंत्राटी मजूर येथे बांबू तोड करत असत. अनेक गावांच्या क्षेत्रांत फिरस्ते लोकही निरनिराळ्या जैविक संसाधनांचा वापर करतात. उदाहरणार्थ,नाशिक जिल्ह्यातील भरपूर पावसाच्या घाटमाथ्याच्या प्रदेशातील लोक पावसाळ्यात गायी घाटाखालील कोकणातल्या गावांच्या वनक्षेत्रात चराईसाठी पाठवतात. तर सातारा जिल्ह्यातील पर्जन्यछायेच्या प्रदेशातील मेंढपाळ पावसाळा संपल्यावर कोंकणात हलतात.अशा फिरस्त्या गटांनाही वनाधिकार कायद्यानुसार हक्क दिलेले आहेत. ग्रामसभेने त्यांच्याबरोबर वाटाघाटी करून त्यांचे हक्क निश्चित करावे अशी अपेक्षा आहे. ह्या प्रक्रियेची पूर्वतयारी म्हणून त्यांच्याबद्दल गावातील जाणकार लोकांकडे असलेली माहिती, तसेच ह्या फिरस्त्या समाजांतील सदस्य भेटल्यास त्यांच्याकडून गोळा केलेली माहिती नोंदवावी. अशा नानाविध हितसंबंधी गटांना जाणून घेऊन, त्यांच्याशी जरूर तेव्हा तडजोड करून, त्यांच्या सहभागाने सामूहिक वनसंपत्तीची सुव्यवस्था करणे हे मोठेच आव्हान आहे. ह्या दृष्टीने माहिती संकलित करण्यासाठी तक्ते ५,६ व ७ यांचा उपयोग करता येईल. पहिले उदाहरण आहे विरपुरच्या स्थानिक हितसंबंधी गटांचे: विरपुर ता. शहादा जि. नंदुरबार : तक्ता क्र. ५ स्थानिक हितसंबधी गट अ.क्र. | हितसंबधी | महत्वाची कामकाजे गटाचे नांव संबधित | घटक घटकांची अंदाजे संख्या

भूमिहीन || जळावू लाकडे विक्री ६० | कुटुंब | शेतकरी | मंडव,जळावू लाकडे,दांड्या,कांबट्या,शेती | ८० अवजारासाठी | कुटुंब | m | शिकारी | मोर, ससे,लाव-या,तितर,घोरपड मारणे | ८ ७ | कुटुंब कंदमुळे, वनस्पती, वेली 9 कुटुंब |