पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जीवाचे मराठी नाव | चारोळी जांभूळ जातीचे शास्त्रीय | बुखनानिया लांझान सीझीजियम क्युमिनी नाव प्रमुख उपयोग | फळः माणसे | व पक्षी खातात. |||||||| फळ: माणसे | फळः माणसे व पक्षी खातात. व पक्षी खातात. ताटले (कूड) बनवतात. औषधी उपयोग || दातन करतात | डिंकः चबक निघते | दातण करतात तेव्हा लेप लावतात जेथे आढळते त्या | उंबरापाणी भूभागाचे नाव । कमी प्रमाण जवळ | उंबरापाणी प्रमाण कमी | साबडीपाणी, उंबरापाणी, जांभीपाणी, नवागावपाणी जांभीपाणी प्रमुख उपद्रव

  • स्थानिक, बाह्य व फिरस्ते हितसंबंधी गट नोंदवणे [तक्ता ५,६,७] भारतीय गावसमाजांची रचना साधारणतः मोठी गुंतागुंतीची असते, त्यातील वेगेवेगळे वर्ग उपजीविकेसाठी निरनिराळ्या संसाधनांवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, आमाझीरीया या मध्यप्रदेशातल्या सिवनी जिल्ह्यातील गावात गोंड समाजातील लोक प्रामुख्याने शेती करतात, जंगलातून गौण वनोपज आणून त्याची विक्री करतात, व थोड्या प्रमाणात मजुरी करतात. बन्सोड समाजातील लोक प्रामुख्याने बांबूच्या टोपल्या, चटया, त' बनवतात. तर सपेरे ही साप पकडून त्यांचे खेळ करणारी जनजात आहे. हे जंगलातुन आणि शहरातील घरांतूनही साप पकडतात, अमरकंटक (नर्मदा नदीचे उगमस्थान) येथून औषधी वनस्पती आणुन त्यांची विक्री करतात, आजकाल मजुरी करतात. सामूहिक वनसंपत्तीपासून ह्या तीन समाजातील लोकांच्या अपेक्षा साहजिकच थोड्याबहुत तरी भिन्न भिन्न असतील. ही वस्तुस्थिति लक्षात घेऊन गावसमाजात असे कोण कोणते वेगवेगळे हितसंबंध असणारे गट आहेत ह्याची नोंद करून त्या सर्वांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे श्रेयस्कर ठरेल.