पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

योजनेनुसार ठाकरवाडी –निर्गुडी-तिसगांव परिसरातील तलाव, नालाबंडिंग, कटबंडिंग, लेव्हलिंग (सपाटिकरण), रस्ते ह्या सारखी कामे पूर्ण करण्यात आली. । या दरम्यान ठाकरवाडी-भिल्लवाडी –निर्गुडि (खु. आणि बु.) आणि तिसगांव ही गांवे, वाडी, तांडा, तिसगांव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत होती. परंतु नंतर वस्ती वाढली व ठाकरवाडी-भिल्लवाडी –निर्गुडि (खु. आणि बु.) ही सारी वस्ती निर्गुडि ग्रामपंचायत अंतर्गत आली आणि तिसगाव ग्रामपंचायत स्वतंत्र झाली. यानंतरच्या कालखंडात लोकनायक जयप्रकाश नारायण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले व राजर्षी शाहू महाराज ह्यांच्या विचारांवर आधारित युवक क्रांती दलाची चळवळ सुरु झाली. त्याचा एक कार्यक्रम म्हणून गावोगाव लोकसमिती स्थापन केली गेली. जमीन, चारा, पाणी, रोजगार ह्यावर कार्यक्रम घेतल्या गेले. जमीन, पाणी, जंगल ह्यासारख्या निसर्ग संसाधनांवर दलित, आदिवासी, भटके विमुक्त यांचा पारंपारिक अधिकार आहे - हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविल्या गेला. महात्मा जोतिबा फुले ह्यांच्या शेतक-याचा आसुड ह्या ग्रंथाचे गावोगाव वाचन करण्यात आले. इंग्रजांनी लादलेल्या वननीतीचा परिणाम म्हणून जंगलात रहाणा-या लोकांना हुसकावून लावले गेले. उपरे ठरविले गेले. जंगल व आदिवासी दलित माणूस यांचे नाते तोडले गेले. त्यांना गुन्हेगार ठरविण्यात आले. त्यामुळे वनखाते, पोलिस सरकार आणि दलित आदिवासी असा सतत संघर्ष उभा राहू लागला. गरीबांची गाय बकरी जंगलात न्यायला बंदी आली. | ह्या पार्श्वभूमीवर युक्रांद लोकसमितीने ठाकरवाडी - निर्गुडि, म्हैसमाळ, तिसगाव, भिल्लवाडी, चिंचोली, आखदवाडा, लामनगाव, टाकळी (रा.रा.), तांडा, धामणगाव आदि खुल्ताबाद तालुक्यातील अनेक गावांतून जन चळवळ उभी केली. हे लोण फुलांब्री, कन्नड, सिल्लोड, वैजापूर, गंगापूरसह संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातील ७०० पेक्षा अधिक गावातून पसरले. या चळवळीचा एक भाग म्हणून सरकारी महसूल वनपडीत जमिनी, गायरान जमिनी सामूहिकरीत्या कसण्याची मोठी मोहीम राबविण्यात आली. वनखात्याच्या ताब्यातील वनजमिनीवरील मोठे जंगल कंत्राटदार-व्यापारी व शासकिय कर्मचारी यांच्या साटेलोट्यातून नष्ट करण्यात आले. त्यातून त्यांनी त्यांचा आर्थिक फायदा करुन घेतला. हे सारे उघडपणे घडताना आदिवासी दलितांनी पाहिले होते. म्हणून त्यांच्या मनात प्रचंड असंतोष होता. इंग्रजांनी आम्हाला जंगलाबाहेर लोटण्याचा प्रयत्न केला. जंगलावरील आमचे पारंपारिक अधिकार एकतर्फी कायदा करुन हिसकावून घेतले व स्वतंत्र भारतात नोकरशाहीने बयांच्या सहकार्याने उरलेसुरले मोठे जंगल कापून नेले. त्यामुळे जंगल जमिनीवर आमचा जनतेचा अधिकार आहे. आम्ही सराईत गुन्हेगार नाही. कष्ट करुन राबराब राबणे, पोट भरणे हा भारतीय संविधानाने आम्हाला हक्क मिळाला आहे. ह्या भुमिकेतुन ठाकरवाडी-निर्गुडीच्या महसुल व वन जमिनीवर परत ताबा मिळविला आणि