पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उपलब्ध आहे. १९९५ सालापासून अशी नोंदणीपत्रके बनविण्याच्या कामाला सुरवात झाली. बेंगलूरूच्या “फाउंडेशन फॉर रीव्हायटलायझेशन ऑफ लोकल हेल्थ ट्रेडिशन्स” या संस्थेने औषधी वनस्पतींच्या उपयोगाच्या संदर्भात अशा कार्यक्रमाचा आरंभ केला. ह्यावर पुढील काम बेंगलूरूच्याच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने देशातील सात राज्यांतील अनेक शैक्षणिक संस्था व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने केले. त्यांनी १९९५-९७ च्या दरम्यान राजस्थान, हिमाचल, आसाम, ओरीसा, झारखंड, कर्नाटक, व अंदमान-निकोबारातील ५२ गावांमध्ये असे दस्तऐवज बनवले. यानंतर देशातील पूर्ण साक्षर बनलेल्या केरळातील एर्नाकुलम जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ८२ ग्रामपंचायतींत, मुख्यत: शेतीवर लक्ष केंद्रित करून अशी नोंदणीपत्रके बनवली गेली. तसेच रूरल कम्यून्स, पश्चिम बंग विग्यान मंच, नवधान्य, डेक्कन डेवलपमेंट सोसायटी, सोसायटी फॉर एन्व्हयारनमेंट अँड डेव्हलपमेंट अशा अनेक संस्थांनी ह्यात योगदान दिले आहे. । याचा परिपाक म्हणून इन्डियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने ह्याची कार्यपद्धती व पेबिन्फ़ो नावाची एक रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टिम बनवली आहे. ह्याचा विस्तुत विचारविमर्श बेंगलूरू, पुणे, दिल्ली, भुवनेश्वर, व गुवाहाटी येथील ५ देशव्यापी चर्चासत्रात केला गेला. शेवटी जून २००६ मध्ये राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने एका राष्ट्रीय परिसंवादात याचा उहोपाह करून त्याला मान्यता दिली. अशा रीतीने अगदी मूलभूत ग्रामपातळीवर नैसर्गिक संसाधनांच्या नियोजनासाठी एक सुव्यवस्थित चौकट उपलब्ध झाली आहे. ह्या अनुभवाचा फायदा घेऊन आपण पुढील पाय-या चढू शकू. याशिवाय पर्यावरण शिक्षणाबाबत २००५ साली झालेल्या अभ्यासक्रमाच्या चौकटीच्या परीक्षणाच्या दोन महत्वाच्या शिफारसी केन्द्रीय शैक्षणिक सल्लागार मंडळाने मान्य केल्या आहेत. या शिफारसींनुसार : > विद्याथ्र्यांनी त्यांच्या परिसराचे प्रत्यक्ष निरीक्षण, माहिती व्यवस्थित संकलित | करणे व त्या निरीक्षणांचा अर्थ लावणे यात सहभागी व्हावे शाळा महाविद्यालयांतील विद्याथ्र्यांच्या सहभागाने पर्यावरणाची सद्यःस्थिती व | त्यात चाललेले बदल यांवर माहिती संकलित करावी. ह्या शिफारसींची अंमलबजावणी आता सुरु होत आहे. ह्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पातूनही जैवविविधतेची नोंदणी करण्यास चांगली मदत मिळू शकेल. पायरी १३. वाडी / पायांच्या पातळीवरील जैवविविधता व्यवस्थापन कृति आराखडा बनवणे व त्याच्या आधारे रोहयोसाठी रोजगाराचे नियोजन करणे जैवविविधतेचा, तसेच जैविक संसाधनांचा चिरस्थायी पद्धतीने वापर करणे,त्यांना वृद्धिंगत करणे, त्यांचे पुनरुज्जीवन करणे, व या प्रक्रियेतून रोजगार निर्माण करणे, ही सर्व समाजाची, आणि प्रत्येक गावसमाजाचीही महत्वपूर्ण उद्दिष्टे असतील. ही उद्दिष्टे साधण्यासाठी या संसाधनांची सद्यःस्थिति, त्यांच्यात काय व कसे बदल होत आहेत,