पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जैवविविधतेचा टिकाऊ, नीटनेटका वापर व पुनरुज्जीवन जैवविविधतेचा टिकाऊ, नीटनेटका वापर व पुनरुज्जीवन हे निश्चितच गावसमाजांच्या हिताचे आहे. असा सुनियोजित वापर करण्याचे अनेक व्यावहारिक लाभही आहेत. उदाहरणार्थ, शासनाने तक्ता ग (वन जमिनींच्या सामूहिक हक्कांसाठीच्या दाव्याचा अर्ज भरण्याबाबत सूचना) मध्ये सामूहिक हक्काचे नाव, सर्वे/कंपार्टमेट नंबर, क्षेत्र (एकर) व परिमाण (वार्षिक) ही माहिती विचारलेली आहे. ही माहिती पुरवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या जैविक संसाधनांबद्दल ती काय आहेत, कोठे उपलब्ध आहेत व किती प्रमाणात उपलब्ध आहेत ही सर्व माहिती असणे आवश्यक आहे. आज अशी माहिती सहजासहजी उपलब्ध असणार नाही. परंतु यासाठी मुद्दाम प्रयत्न सुरू करणे उचित ठरेल. । अशी माहिती संकलित करण्यासाठी जैवविविधता कायद्याचा लाभ घेता येईल. या कायद्याच्या अंतर्गत केन्द्र शासनाने बनवलेल्या नियमांत खालील तरतुदी आहेत: २२(६): स्थानिक लोकांच्या सल्ल्याने “लोकांचे जैवविविधता नोंदणीपत्रक बनवणे हे जैवविविधता व्यवस्थापन समित्यांचे मुख्य कर्तव्य आहे. ह्या नोंदणीपत्रकात स्थानिक जैविक संसाधनांची उपलब्धता आणि ज्ञान, त्यांचे औषधी व इतर उपयोग व संबंधित पारंपारिक ज्ञान याबद्धल परिपूर्ण माहिती असेल. | (७) (बाह्य व्यक्तींनी जैविक संसाधने अथवा ज्ञान वापरणे, व पेटंटांसाठी अर्ज करणे यांबद्दल) मान्यता देण्याच्या संदर्भात राज्य जैवविविधता मंडळ किंवा प्राधिकरणाने विचारलेल्या विषयांबाबत सल्ला देणे, स्थानिक वैदू व जैविक संसाधनांचे उपयोग करणारे लोक यांची माहिती संकलित करणे ही जैवविविधता व्यवस्थापन समितीची आणखी कर्तव्ये आहेत. | (९) राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण व राज्य जैवविविधता मंडळ हे जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना लोकांचे जैवविविधता नोंदणीपत्रक बनविण्यासाठी मार्गदर्शन करतील, व तांत्रिक मदत पुरवतील. (१०) जैवविविधता व्यवस्थापन समित्या लोकांचे जैवविविधता नोंदणीपत्रक बनवतील व पडताळून पाहतील. ह्या समित्या बाहेरच्या कोणा-कोणाला स्थानिक जैवविविधता संसाधनांचा व पारंपारिक ज्ञानाचा वापर करू दिला आहे, त्यासाठी काय संग्रहण शुल्क आकारण्यात आले आहे, आणि त्यातून मिळालेला लाभांश व त्याचे वाटप कसे झाले आहे यांचा तपशील ह्याचीही नोंद ठेवतील. लोकांचे जैवविविधता नोंदणीपत्रक (People's Biodiversity Register: पी बी आर्) | जैवविविधता कायद्यात उल्लेखिलेले “लोकांचे जैवविविधता नोंदणीपत्रक” हे स्थानिक पातळीवर तपशिलाकडे बारकाव्याने लक्ष देऊन, काळजीपूर्वक, जैवविविधतेचे व्यवस्थापन व पुनरुज्जीवन करण्याचे एक चांगले साधन ठरू शकेल. या दृष्टीने बराच अनुभव