पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रत्येक गावसमाज / मोहल्ला जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, कोषाध्यक्ष व सचिव हे ग्राम पंचायत पातळीवरील जैवविविधता व्यवस्थापन समितीचे पदसिद्ध सदस्य असतील. त्या शिवाय प्रत्येक समिती मधून निवडून पाठविलेले दोन सदस्य प्रतिनिधी हे सुद्धा सदस्य असतील. या सर्वांची मिळून ग्राम पंचायत पातळीवरील जैवविविधता व्यवस्थापन समिती बनेल. ग्राम पंचायत पातळीवरील जैवविविधता व्यवस्थापन समितीची पहिली सभा सरपंचांच्या अध्यक्षतेखाली होईल. त्यात समितीच्या कार्यकारी मंडळाची निवड सर्वसहमतीने करण्यात यावी. कार्यकारी मंडळात १ अध्यक्ष, १ उपाध्यक्ष, १ कोषाध्यक्ष, १ सचिव, १ सहसचिव व १० सदस्य असतील. अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष व सचिव यापैकी किमान एका पदावर स्त्री तसेच १० सदस्यांपैकी किमान चार सदस्य स्त्रिया असणे आवश्यक आहे. कार्यकारी मंडळाच्या एकूण १५ पदाधिका-यांपैकी किमान एक अनुसूचित जाती व एक अनुसूचित जमातीचे (उपलब्ध असल्यास) असणे आवश्यक असेल. आज पासून ३० दिवसाचे आत सर्व गावसमाज / मोहल्ला जैवविविधता व्यवस्थापन समित्या गठित करण्यात याव्या व ६० दिवसाचे आत ग्राम पंचायत पातळीवरील जैवविविधता व्यवस्थापन समिती गठित करण्यात यावी. प्रत्येक गावसमाज / मोहल्ला जैवविविधता व्यवस्थापन समितीचे तसेच ग्राम पंचायत पातळीवरील जैवविविधता व्यवस्थापन समितीचे सदस्य व कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी कोण आहेत याची माहिती एका रजिस्टर मध्ये लिहून ते रजिस्टर ग्राम पंचायत कार्यालयात ठेवण्यात यावे. | प्रत्येक गावसमाज / मोहल्ला जैवविविधता व्यवस्थापन समितीचे तसेच ग्राम पंचायत पातळीवरील जैवविविधता व्यवस्थापन समितीचे सदस्य व कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी कोण आहेत याची माहिती मा. जिल्हाधिकारी यांना लेखी कळविण्यात यावी. | जैवविविधता नियम २००४ मधील नियम २२(६) अनुसार प्रत्येक गावसमाज | मोहल्ला जैवविविधता व्यवस्थापन समितीचे स्वतंत्र लोकांचे जैवविविधता नोंदणीपत्रक (पी.बी.आर.) तयार करावे. सर्व गावसमाज / मोहल्ला जैवविविधता व्यवस्थापन समित्यांच्या लोकांच्या जैवविविधता नोंदणीपत्रक (पी.बी.आर.) चे एकत्रिकरण करुन ग्राम पंचायत पातळीवरील जैवविविधता व्यवस्थापन समितीचे लोकांचे जैवविविधता नोंदणीपत्रक (पी.बी.आर.) तयार करण्यात यावे. लोकांचे जैवविविधता नोंदणीपत्रक (पी.बी.आर.) तयार करण्याचे काम सुयोग्य रीत्याव्हावे याकरिता ग्राम पंचायत पातळीवर विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. - - - - - - - - - - - - - -- - - -- - - -- - - - - - - - - - -