पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लक्ष पुरवण्यासाठी एक कार्यकारिणी नियुक्त करता येईल, व त्यास एक पूरक अभ्यास मंडळ मदत करू शकेल. (२) जैवविविधता कायद्यानुसार ग्रामपंचायत पातळीवर जैवविविधतेचे व तत्संबंधित ज्ञानाचे माहिती संकलन व व्यवस्थापन करण्यासाठी स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समितींच्या रूपात एक अधिकृत यंत्रणा अस्तित्वात येत आहे. या यंत्रणेचा दुवा वनाधिकार कायद्यातून जी व्यवस्था उभी रहात आहे तिच्याशी जोडून दिल्यास एक भरीव, एकसंध काम शक्य होईल. (३) राष्ट्रीय रोजगार हमी कार्यक्रमातून निसर्गसंपत्तीचे संरक्षण, संगोपन, पुनरुज्जीवन करण्याची चांगली संधी आहे. यासाठी कामांची आखणी करण्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामसभेवर सोपवण्यात आली आहे. अशा कामांची एक व्यवस्थित योजना बनविणे हे ग्रामसभेचे कर्तव्य आहे. ह्या नियोजनाची वनसंपत्तीच्या व्यवस्थापनाच्या नियोजनाशी नेटकी सांगड लावता येईल. (४) पिकांचे संरक्षित वाण आणि शेतक-यांचे अधिकार कायद्यानुसार सर्व पारंपारिक वाणांची नोंदणी होईल, व ती वाणे टिकविणा-या शेतक-यांना खास अनुदान मिळू शकेल. अशा पारंपारिक वाणांची, व शेतक-यांनी स्वतः निर्माण केलेल्या वाणांची नोंदणी व ती जतन करण्याची योजना हा ग्रामपातळीवरील निसर्गसंपत्तीविषयक नियोजनाचा एक भाग राहील. हा कार्यक्रम सामूहिक वनसंपत्तीच्या जोपासनेशी जोडून दिल्यास वृक्षावरणाखालील तसेच लागवडीखालील वनजमिनीवर वैविध्यपूर्ण जीवसृष्टी उभी करता येईल. ह्या दृष्टीने तक्ता ‘क’ मधील वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीतील १२ ते १७ या पाय-यांवर कसे चढत जावे याचा विचार करावा लागेल. पायरी १२. जैवविविधता व्यवस्थापन समितीचे गठन करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवरील ग्रामसभा बोलविणे, या संदर्भात वाडी / पायांच्या ग्रामसभांनी स्वतंत्रपणे काम करण्यास मान्यता देणे | वनाधिकार कायद्याच्या पाचव्या कलमात वनअधिकार धारकांच्या पुढील कर्तव्यांचा उल्लेख आहे: (क) वन्यजीव, वने आणि जैव विविधतेचे रक्षण करणे. (ख) नजिकची पाणीसाठा क्षेत्रे, पाण्याचे स्त्रोत आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांचे पुरेसे संरक्षण होत आहे याची दक्षता घेणे. जैवविविधतेच्या रक्षणात चिरस्थायी, टिकाऊ वापर अंतर्भूत आहे. वनाधिकार कायद्याच्या व्याख्यांच्यात हा “टिकाऊ वापर” जैवविविधता कायद्यातील व्याख्येप्रमाणे मानावा असे दर्शिवले आहे. टिकाऊ वापर म्हणजे लोकांच्या इच्छा- आकांक्षा पुरवण्याचे जैवविवधतेचे सामर्थ्य दूर पल्ल्याने टिकून राहील असा वापर” अशी ही