पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होते. जमीनदारीचा सगळाच इतिहास काही काळाकुट्ट नव्हता. ही गोष्ट समाजवाद्यांनी सोयीस्कररीत्या नरजेआड केली. खानदानी जमीनदार बहुतांशी १८५७ च्या उठावानंतर देशोधडीला लागले, फासावर चढले. त्यांच्या जागी इंग्रजांनी त्यांना सामील झालेल्या गावगुंडांना जमीनदार नेमले. नवीन जमीनदारांच्या उन्मत्तपणात अमेरिकेतील यादवी युद्धासारख्या घटनांनी शेतमालाच्या व्यापाराला काही काळ मिळालेल्या छप्परफाड धनदौलतीमुळे हे नवे जमीनदार उन्मत्त झाले. कथा-कादंबऱ्यातील ऐषआरामी, विलासी, उन्मत्त, जुलमी जमीनदार हे प्रामुख्याने या समाजातील होते. इतकी वस्तुनिष्ठता समाजवाद्यांच्या मठीत असू शकतच नाही. शहरात मालक नोकरांवर जुलूम करत नव्हते, असे नाही; घरगड्यांवर, मोलकरणीवरही अत्याचार होत. पण त्या कारणाने घरमालकांची जायदाद त्यांच्या नोकरांना मिळावी असा युक्तिवाद कोणा तत्त्वनिष्ठ समाजवाद्याने केल्याचे ऐकिवात नाही.
 जमिनीच्या फेरवाटपाचे समर्थन करण्यासाठी समाजवादी अर्थशास्त्र्यांनी काही मोठे विनोदी निष्कर्ष काढले. लहान जमिनीच्या तुकड्याची उत्पादकता जास्त असते, छोटे शेतकरी त्यांच्या मालाला अधिक चांगली किमत मिळवतात, ही अशा निष्कर्षाची उदाहरणे. जमिनीच्या छोट्या तुकड्यांची उत्पादकता जास्त असते कारण त्यावर सगळ्या शेतकरी कुटुंबाची जीवतोड मेहनत होते, उत्पादकतेचा संबंध केवळ जमिनीशी नाही श्रमाशी आहे.
 जमिनीच्या मोठ्या तुकड्यात उत्पादकता कमी आढळते, कारण तेथे श्रमशक्ती कमी पडते; छोट्या तुकड्यातील शेतीवरील कष्टात जी आपुलकी असते त्याची भरपाई करणारे आधुनिक व्यवस्थापन मोठ्या शेतीलाही परवडत नाही. असल्या बारकाव्यांची पत्रास डाव्या अर्थशास्त्रांना असायचे काय कारण? दहा पोती वांगी मुंबईला पाठवणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा पाटीभर वांगी डोईवर घेऊन पायी चालत बाजारच्या गावी जाणाऱ्या शेतकरणीला किलोमागे जास्त भाव, मिळतो एवढ्या साध्यासुद्धा गोष्टीत समाजवाद्यांना लहान शेतीची श्रेष्ठता स्पष्ट दिसत असे.
 रशियातील आणि इतर समाजवादी देशांतील सामूहिक शेतीचे कौतुक करणारे भारतात मात्र छोट्या छोट्या तुकड्यांची शेती झाली पाहिजे असे आग्रहाने मांडीत.

 शेतीवरील बचत ओरबाडून नेली जात आहे, शेतावरची माणसे मात्र शेतावरच ओझं बनून राहिली आहेत, ज्यांच्याकडे थोडीफार जादा जमीन असे,

बळिचे राज्य येणार आहे / ९१