पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/73

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बाजारभावाने विकण्याची परवानगी अशा जमिनींच्या मालकांना व्यक्तिगत अथवा एकत्रित जबाबदारीवर देण्यात येईल. अशा तऱ्हेने जमिनीचा विकास करणे शेतकऱ्याच्या कुवतीबाहेर असेल तर त्याला विकासखर्च वजा जाता विकसित जमिनीच्या किमतीच्या जवळपास किमत मिळाली पाहिजे' (राष्ट्रीय कृषिनीती, शरद जोशी, पृष्ठे ३७, ३८)
 मावळे पुन्हा इतिहास घडवणार
 खुल्या अर्थव्यवस्थेत सरकारी भूसंपादनास आर्थिक क्षेत्रात तरी स्थान नाही, भूसंपादनाचा कायदा मोडीत काढण्यासाठी मावळातील शेतकरी उठतो आहे. मावळाचा शेतकरी उठतो तेव्हा तेव्हा इतिहास घडतो हाही इतिहास आहे. आपले शिवार वाचवायला चिखली सज्ज झाली आहे. इतर शेतकऱ्यांनाही आपल्याला शिवाराच्या रक्षणासाठी उभे राहावे लागेल.

(शेतकरी संघटक, २१ मे १९९३)

बळिचे राज्य येणार आहे / ७५