Jump to content

पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पण तुम्ही जर सांगितलं की शेतकऱ्यांनी त्यांना जे काही खरेदी करायला लागत असेल- मीठमिरची कापडचोड- ते शेतकऱ्यांच्या दुकानांतूनच खरेदी करावं आणि त्यांना जो माल विकायला तो शेतकरी संघटनेच्या माजघर शेती, व्यापार शेती, निर्यात शेती या मार्गातून विकला तर त्यांना फायदा मिळणार आहे आणि हे जर एकदा शेतकऱ्यांना स्पष्ट झालं तर शेतकऱ्यांच्या सद्भावना तुमच्याइतक्या दुसऱ्या कुणाच्याही पाठीशी असणार नाहीत. याचा फायदा घ्यायचा किंवा नाही हे आता स्वतंत्र झालेल्या शेतकऱ्यांनी ठरवायचे आहे.


 बदलाची संधी प्रथमच आली
 याचा अर्थ असा नाही की आता शेतकरी संघटना जिल्ह्या-जिल्ह्यात 'पब्लिक लिमिटेड कंपन्या' उघडणार. असा गैरसमज कुणाचा होऊ नये. शेतकरी संघटना ही कधीही व्यापारी संघटना होणार नाही. शेतकरी संघटना ही आंदोलक संघटनाच आहे. आम्ही शेतकऱ्यांना सांगतो आहोत की तुम्ही स्वतंत्र झाला आहात. आता जन्मतः स्वतंत्र असतात तर जे केलं असतं तेच करायला लागा आणि जर आमच्या असं लक्षात आल की या स्वातंत्र्यावर पुन्हा कुणी गिधाड घाला घालीत आहेत मग ती जातीयवादी असोत का बिगर जातीयवादी असोत त्या नाठाळांच्या माथी काठी घालणं हेच शेतकरी संघटनेचा जो पाईक, जो आधार तो शेतकरी आता निव्वळ रुमणं घेऊन, बैलासारखी जुवाच्याखाली मान घालून जर चालत राहिला तर त्याची लढाई आता जिंकली जाऊ शकत नाही. आता तुमच्या पायाच्या पट्ट्या काढणं अपरिहार्य आहे तुम्हाला पायावर उभे राहाणं अपरिहार्य आहे. तुमच्या पायात रक्त खेळू लागल्यानंतर असह्य वेदना होणार आहेत. पण माणूस म्हणून जगण्याची या वेदना ही किंमत आहे.

 शेगावच्या जाहीरनाम्यातील चतुरंग शेतीच्या कार्यक्रमाचा सविस्तर अर्थ असा आहे. स्वतंत्र झालेला शेतकरी आता आपल्या प्रश्नांची उकल कशी करील हे आज कोणालाही नक्की सांगणे कठीण आहे; पण ती तो कशी करू शकेल यासाठी सीताशेती, माजघर शेती, व्यापार शेती आणि निर्यात शेती या चार प्रयोगशाळा आहेत. आपल्याला धडपडत चालावं लागणार आहे. काही वेळा आपण पडू, काही वेळा चुका करू. कदाचित खोट खाऊन घरी बसण्याचीसुद्धा वेळ येईल. दिवाळखोर तर तसे आपण गुलामगिरीतही झालो होतो. दिवाळखोरच व्हायचं नशिबी असेल तर स्वातंत्र्यातील दिवाळखोरीचा

बळिचे राज्य येणार आहे / ४७