पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रकारची यंत्रसामग्री पुरविणारी 'अल्फा लाव्हल' या नावाची सर्वात मोठी कंपनी आहे. सोयीसाठी या प्रक्रिया कल्पनेला आपण 'अल्फा लाव्हल' प्रक्रिया म्हणूया. आमच्या या प्रयोगात 'अल्फा लाव्हल' प्रक्रिया आम्ही नाकारतो आहोत.
 दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा. आपण कोणत्या तऱ्हेची प्रक्रिया करणार आहोत? 'अल्फा लाव्हाल'ची नाही. हे सगळे कारखानदार बोलून चालून राजकारणात पडलेले. उघडच मलिदा खायला निघालेले. साखर कारखाना काढायला निघालेल्या कोणाही माणसाला विचारलं की 'कायरे, तू लोकांचं भलं करणार का?' तर तो तुम्हाला प्रामाणिकपणे म्हणेल, तुमचा मित्र असेल तर, 'काही तरी काय विचारता? कारखाना काय लोकांचा फायदा करून देण्याकरिता काढायचा असतो काय?'
 दुसराही एक प्रकार लक्षात घ्यायला हवा. शेतकरी संघटनेच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मुलूखमैदान तोफ म्हणून गाजलेले श्री. माधवराव खंडेराव मोरे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पिंपळगावला प्रक्रियाक्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि द्राक्षापासून शॅम्पेन काढून परदेशात पाठविण्याची योजना राबविली. यंत्रसामग्री ही पुन्हा 'अल्फा लाव्हल'ची आणि शॅम्पेन परदेशात विकायची म्हणजे सी- थर्टी साखर काढून पोत्यांमधून विकण्याइतक सोपं नाही! त्याची बाटलीही परदेशातली, त्याचं लेबलही परदेशातलं, त्याचं बूचही परदेशातलं आणावं लागतं. आता माधवरावही म्हणू लागले की त्यांनासुद्धा लोकांना द्राक्षाचा भाव किलोला दहा रुपयाच्या वर देता आला नाही.
 म्हणजे मोठं यंत्र कुठून तरी घ्यायचं, ते एकाजागी उभं करायचं. तिथं काही संचालक मंडळी नेमायची आणि त्यातून प्रक्रिया करून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल ही कल्पना अत्यंत चुकीची, अत्यंत खोटी आहे. मग नेस्लेसारख्या आंतराष्ट्रीय कंपन्या प्रक्रिया करून फायदा काढतात हे डॉ. कुरियनचं म्हणणं चूक आहे का ? नाही. या कंपन्याना फायदा होतो हे खरं आहे पण त्याचं मुख्य कारण प्रक्रियेसाठी त्या वापरत असलेली यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान त्यांनी स्वतःच विकसित केलेलं असतं हे आहे.

 एक तिसरं उदाहरण घेऊ. मुंबईला नुकतंच एक शेतीमालावरील प्रक्रियांसंबंधी प्रदर्शन झालं. दिल्लीला १५ जानेवारीपासून एक त्याहून मोठं प्रदर्शन आहे. शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या ज्या हिंदुस्थानातील कंपन्या आहेत त्यांचा माल तिथं ठेवला जाईल. या प्रदर्शनांत काय माल ठेवतात? युरोपातला मनुष्य

बळिचे राज्य येणार आहे / ४३