पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/405

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साराबंदीच्या चळवळीला महाराष्ट्रभर अमाप प्रसिद्धी मिळाली. एक पैसाही न खर्चता. सरकारने शेतकरी चळवळीच्या बातम्यावर बंदी घातली तरीसुद्धा या बातम्या लपून राहावयाच्या नाहीत. एकाच्या मुखातून दुसऱ्यांच्या कानात अशा या बातम्या पसरत राहतील.
 सारांश म्हणजे साधनांची कमतरता ही शेतकरी संघटनेच्या फायद्याचा मुद्दा आहे. राजकीय जीवनातील कीड आपल्याकडे त्यामुळे उडून येणार नाही. हे आपले मोठे भाग्य आहे. आपली खरी साधन संपत्ती आहे दलित पीडित असा ५० कोटी कोरडवाहू शेतकरी आणि संघटितपणे लढा उभा करण्याची त्याची ऐतिहासिक गरज.

(साप्ताहिक वारकरी दि. १० नोव्हेंबर १९७९ ते दि. १६ फेब्रुवारी १९८० मधून साभार)

बळिचे राज्य येणार आहे / ४०७