पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/381

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कसून आपली संघटना थांबत नाही तर आपले तत्त्वज्ञान प्रत्यक्षात उतरवण्याची तिची धडपड चालू असते. या संघटनेच्या मार्गात वर सांगितलेल्या सर्व अडचणी येत आहेत, येणार आहेत. त्यांचा सामना कसा करावयाचा व त्यातून मार्ग कसा काढावयाचा याचा विचार यापुढे करावयाचा आहे.


 दोन
 शेतकरी तितका एक एक
 शेतकऱ्या-शेतकऱ्यांना विभागणारे वादविवाद दोन प्रकारचे. पहिला म्हणजे, जमिनीवरून झालेली भांडणे, जातिजातीतील भेद, निवडणुकांच्या वेळी होणारी तेढ, लग्नसमारंभातले मानापमान, गावागावातील मत्सर आणि घराघरातील वैर इत्यादि. अशा अनेक चिरा प्रत्येक गावाला पडलेल्या आहेत. कोणच्याही कामाकरिता सगळा गाव एकत्र म्हणून येत नाही. गावचे म्हणून कितीही चांगले काम निघू द्या, सगळे मिळून गावकरी कामाला निघतील हे अशक्यच. गावदेवतांच्या उत्सवाच्या वेळी नाही म्हणायला सर्व गाव जमा होतो; पण त्यावेळी एकदिलाने काम करण्याचा फारसा प्रश्न नसतो. देवाचं जे काय करायचं ते जो तो स्वतंत्रपणे करतो. आपला मोठेपणा दाखवण्याच्या अहमहमिकेने एकत्र आलेला तो समाज अंतर्यामी चिरफळलेलाच असतो.
 घाणीतील किडे
 असल्या वादविवादाचे बाहेरून दिसणारे आणि दाखवण्यात येणारे कारण कोणतेही असो, खरे काण हे की ग्रामीण समाजाची प्रगती भांबली आहे. ज्या समाजाची सतत प्रगती होत नाही तो तुंबलेल्या पाण्याप्रमाणे अशुद्ध बनत जातो. त्यावर शेवाळे आणि घाण जमते, किडे वळवळू लागतात.

 आज सर्व देशांत भाषांबद्दल भांडणे चालू आहेत. राष्ट्रभाषेचे स्थान काय असावे याबद्दल रण माजत आहेत. शिवसेनेसारख्या संकुचित विचारांना प्रतिष्ठेचे स्थान मिळते. जन सामान्यांचे नेतृत्व ज्यांनी दूरदर्शीपणाने करावयाचे ते लोकप्रतिनिधी नद्या, खनिज द्रव्ये, जमिनीच्या पोटातील तेल व वायू यावर, सवंग लोकप्रियतेसाठी, आपापल्या प्रदेशाचा हक्क सांगतात. स्वातंत्र्याची चळवळ म. गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली भडकत होती तेव्हा कोठे होते हिंदीला विरोध करणारे हे नरवीर. तेव्हा कसे नव्हते कोणी म्हणत की मुंबईतल्या नोकऱ्या मराठी लोकांनाच मिळावयास पाहिजेत म्हणून. त्यावेळी राष्ट्राचा प्रवाह जोमाने चालला होता. अशा वळवळणाऱ्या किड्यांना गतिमान

बळिचे राज्य येणार आहे / ३८३