पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/356

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


अन्नदात्याला आस प्राणदानाची



 शुक्रवार दि. ३० जूनच्या सकाळी शेतकरी संघटकसाठी लेख लिहिण्यासाठी मी बसलो आहे. आज सकाळीच पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग कृषिमंत्री शरद पवार आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांबरोबर विदर्भात येणार आहेत. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा हलकल्लोळ चालला आहे. गेल्या वर्षातच ६०० च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. म्हणजे दर दिवशी सरासरी दोन शेतकऱ्यांनी आपल्या जीवनाचा अंत केला. दुर्दैवाची गोष्ट अशी की इतक्या प्रचंड प्रमाणावर आत्महत्या होऊनही देशातील कोणाचे अंत:करण कळवळले असे दिसत नाही. विश्वनाथ प्रतापसिंगांच्या राजवटीत मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारण्याचे जाहीर झाल्यानंतर १०-१२ विद्यार्थ्यांनी आत्मदाह करण्याचा प्रयत्न केला आणि दिल्लीचे सरकार गडगडले. सरकारी आकडेवारीनुसार १९९५ सालापासून देशभरात एक लक्ष वीस हजार शेतकऱ्यानी आत्महत्या केल्या आहेत. ही आकडेवारी स्वतः कृषिमंत्र्यांनी राज्यसभेत आणि लोकसभेत सादर केलेली आहे. तरीसुद्धा, काही भयानक घडते आहे असे कोणाला वाटलेसे दिसत नाही. यासंबंधी अभ्यास करण्यासाठी स्वत: पंतप्रधान आज विदर्भात येत आहेत.
 शासकीय अनास्था

 गेल्या दोन वर्षांत शासनाने या आत्महत्यांच्या साथीविषयी अनास्था दाखवली. एवढेच नव्हे तर मृत शेतकऱ्यांची काहीशी टिंगलही केली. आत्महत्यांची कारणमीमांसा करताना दुष्काळ, अतिवृष्टी, पिकांवरील रोगराई अशा अस्मानी कारणांव्यतिरिक्त घरातील आजारपणे, व्यसने, घरगुती भांडणे अशी वैयक्तिक कारणे आणि शेवटी पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेचा अभाव आणि कर्जबाजारीपणा अशा सुलतानी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तर 'कुटुंबाला एक लाख रुपये मिळतात म्हणून शेतकरी आत्महत्या करतात' असे म्हटल्याचे वर्तमानपत्रात प्रसिद्ध

बळिचे राज्य येणार आहे / ३५८