पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/35

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही म्हणून ही चतुरंग यादी करावी लागली.
 पण हा कार्यक्रम म्हणजे आता परिस्थिती १९९१ मध्ये बदलल्यानंतर, शेती कशी करावी हे सांगणारे 'आबा पाटील' साखरेची प्रक्रिया कशी करावी हे सांगणारे 'विखे पाटील', निर्यात करणारे आणि कोणी, व्यापार करणारे आणि कोणी यांच्या मार्गाने आम्ही आता जायला लागलो आहोत ही कल्पना सपशेल चूक आहे. उलट, शेती, प्रक्रिया, व्यापार आणि निर्यात या चारही क्षेत्रांमध्ये आजपर्यंत बुजुर्गानी जे जे मांडलं ते उधळून फेकून देण्याकरिता शेगावचा हा चतुरंग कार्यक्रम आहे. आतापर्यत, शेती कशी करावी याच्याबद्दलच्या ज्यांनी ज्यांनी कल्पना तोडल्या त्या सगळ्यांनाच चुकीचं ठरवणारा असा कार्यक्रम आहे. कारण, आता जन्मांधाला दृष्टी आली आहे. दृष्टी आल्यानंतर तो जुन्या पंडितांनी सांगितलेलं काहीही मानायला तयार नाही.
 सुरुवातीच्या वेदना ही स्वातंत्र्याची किंमत आहे

 या मधल्या काळामध्ये संघटनेने काय काम केलं ? चीनमधल्या स्त्रियांविषयी एक हकीकत आहे. चीनमध्ये एकेकाळी अशी कल्पना होती की खानदानी स्त्री कोणती? तर जिला कधीही पलंगावरून उतरून चालावं लागत नाही ती खरी खानदानी असं समजलं जायचं. हरियाणामधला शेतकरी भल्यामोठ्या साफ्याचा फेटा घालतो. एवढ्या मोठ्या साफ्याचा फेटा घालणं म्हणजे किती कठीण ? त्याला स्टार्च लावून तो फेट्याचा साफा ताठ ठेवावा लागतो. तोच जर मजुराचा फेटा असेल तर तो कसातरी गुंडाळला तरी चालतो. कारण त्या मजुराला आपल्या फेट्यावर मालाचं ओझ घेऊन जावं लागतं. शेतकऱ्याच्या साफ्याच्या फेट्याचा तुरा ताठ आहे याचा अर्थ काय? मला काम करावं लागतं नाही असा मनुष्य आहे मी! तशी चीनमधल्या खानदानी महिलांची ऐट काय? यांना पलंगावरून उतरायला न लागल्यामुळे यांचे पाय अगदी बारीक राहतात. मग ते पाय बारीक राहावे याकरिता मोठे प्रयत्न! जन्मल्याबरोबर मुलीचे पाय पट्ट्याने बांधून टाकीत. मग ते पाय साहजिकच लहान राहत आणि तसे राहावे म्हणून कायम पट्ट्यात राहत. पाय लहान राहत पण लहानपणापासून बांधलेले राहिल्यामुळे पुढे त्या मुलींना जन्मभर त्या पायांवर उभे राहणंसुद्धा शक्य होत नसे. चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट आली तेव्हा त्यांनी पहिल्यांदा ही क्रूर अमानुष पद्धत बंद केली. जन्मतः ज्यांच्या पायाच्या पट्ट्या जेव्हा सोडल्या जाऊ लागल्या तेव्हा त्या मुलींनी कळवळून विनंती केली की आता आमच्या पायांतून पुन्हा रक्त खेळू लागलं आहे याच्या वेदना आम्हाला सहन

बळिचे राज्य येणार आहे / ३७