पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/347

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खावटीपोटीतरी काही मिळावे या आशेने शेतकरी मुलताईच्या मामलेदाराच्या कचेरीसमोर जमले. पोलिसांनी कचेरीच्या छपरावर उभे राहून, जनरल डायरला लाजवील अशा क्रौर्याने अंदाधुंद गोळीबार केला. २७ जागीच मेले, त्यात तीन स्त्रिया; घायाळ किती झाले याचा नक्की हिशेब आतापर्यंत लागलेला नाही.
 २१ मार्च १९९८ रोजी दिल्लीला किसान समन्वय समितीची बैठक झाली. या साऱ्या परिस्थितीचा आढावा घेतला गेला. आंध्र प्रदेशचे एस.पी. शंकररेड्डी डोळ्यांत पाणी आणून म्हणाले, 'आपण दक्षिणेत काही तरी केले पाहिजे' पंजाबहून आलेला एक शेतकरी म्हणाला, 'आमच्यात कोणी जीव दिला नाही एवढेच हो! आमची परिस्थिती मोठी कठीण आहे'.
 महाराष्ट्रातल्या काय, कर्नाटकातल्या काय शेतकऱ्यांच्या आत्महत्या दशकानुदशके राबविल्या जाणाऱ्या शेतकरीविरोधी धारेणांचा साहजिक परिणाम आहे. कोणी युगपुरुष अवतरला आणि हिंदुस्थानात शेतकऱ्यांविरुद्ध चाललेल्या अमानुष धोरणासंबंधी साऱ्या जगाला जागविले तर काही आशा आहे. अन्यथा हिंदुस्थानातील शेतकरी मरतच राहतील.आंध्र प्रदेशातील आत्महत्यांकडे थोडे आधिक बारकाव्याने पाहणे आवश्यक आहे.

 पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील उप्पकपाडू गावच्या बी. व्यंकटरामा राव यांच्या आत्महत्येसंबंधी अनेक वर्तमानपत्रांनी सविस्तर वृत्तांत छापले आहेत. व्यंकटरामाच्या बापाने १५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. तो दोन वर्षांपूर्वी कॅन्सरने मेला. बँक तगादा लावू लागली. व्याज धरून द्यायची रक्कम आता झाली रुपये २७६९५. कापसाचे पीक बुडाले; देणे थकले; बॅकचे अधिकारी गावात कर्जवसुलीसाठी आले ; बरोबर पोलिस बंदोबस्त आणि ढोल ताशेवाले. ते साऱ्या गावभर दवंडी देत फिरले. "व्यंकटरामा राव याने बँकेचा भरणा केला नाही म्हणून त्याच्या घरातील चीजवस्तू जप्त करण्यात येत आहे. बँकेला बुडवू पाहणाऱ्या शेतकऱ्यांनो, याद राखा! शेजाऱ्यापाजाऱ्यांनी दीड हजार रुपये जमा करून बँक अधिकाऱ्यांकडे दिले. व्यंकटरामाने गयावया करून 'दवंडी तेवढी थांबवा आणि माझी अब्रू वाचवा' अशी विनवणी केली. काही परिणाम झाला नाही. त्याने पुन्हा एक विनंती केली, शेजारच्या ताडेपल्लीगुडम गावच्या सावकाराकडे जाऊन येण्यापुरता मला अवधी द्या. तो ६० टक्के व्याजाने पैसे देतो म्हणतात, असू द्या. तुमची भरपाई करतो' सावकाराने पैसे दिले नाहीत. व्यंकटरामा परत आला तेव्हा बँकेचे अधिकारी हसतखिदळत घरातील सामान

बळिचे राज्य येणार आहे / ३४९