पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/342

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


मारा, मरू नका!



 दिल्लीत नवे सरकार आले आहे. साऱ्या देशभर चर्चा, नव्या सरकारची जुळवाजुळव, त्याकरिता होणारी देवघेव, धावफळ यांकडे वेधले गेले आहे. आंध्र प्रदेशासंबंधी बातम्या येतात त्या चंद्राबाबू नायडू सत्तेचा खेळ किती चलाखीने खेळत आहेत याबद्दल. कर्नाटकात सत्तेसाठी अशीच रस्सीखेच चालू आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री आर्थिक समस्यांनी पीडलेले, विरोधकांनी चेपलेले आणि त्याहीपेक्षा, ताळतंत्र सोडलेल्या — रिमोट कंट्रोल ने भांबावलेले यासंबंधी बातम्या येतात. आंध्र प्रदेशातील वारंगळ जिह्यात २८० (आकडा २८ मार्च ९८ चा) शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कर्नाटकातील २० शेतकऱ्यांनी जीव दिला, महाराष्ट्रातही हा आकडा १६ पर्यंत पोचला आहे. एवढ्या मोठ्या संख्यने कोणत्याही सुसंस्कृत देशात आत्महत्या झाल्या असत्या तर साऱ्या वर्तमानपत्रांनी आठवडे न आठवडे या एका विषयावरच लिहिले असते. हिंदुस्थानात शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयात वर्तमानपत्रांच्या वाचकांना रस नाही, त्यामुळे किरकोळ उल्लेखापलीकडे काही छापले जात नाही.

 तीन राज्यांत ३०० च्या वर शेतकऱ्यांनी जीव दिला. जगणे अगदीच असह्य झाले म्हणजे असा कडेलोटाचा निर्णय माणूस घेतो. एकदम ३०० जणांना स्वतःचा अंत करून घेण्यापलीकडे पर्याय नाही असे का वाटले? आंध्र प्रदेशात दहा वर्षांपूर्वी प्रकाशम जिल्ह्यात १२ शेतकऱ्यांनी विष पिऊन जीव दिला होता. त्यानंतर जवळजवळ प्रत्येक वर्षी तेथे काही शेतकरी जीव देतातच. २३ मार्च १९९६ रोजी महाष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे थोरगव्हाणहून निघाले आणि सारे कुटुंब घेऊन वर्ध्याला आले. विजेचे बिल भरता आले नाही म्हणून त्यांचे वीज कनेक्शन विद्युतमंडळाने तोडले होते. पाण्याअभावी पिके वाळून चालली होती. ते सारी उघड्या डोळ्यांनी

बळिचे राज्य येणार आहे / ३४४