पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/321

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खेडोपाडी शेतकऱ्यांच्या हाती व्यापारव्यवस्था नाही, उद्योगंधदे नाहीत या कारणाने शेतातली लक्ष्मी शहरात निघून जाते अशी त्यांची कल्पना असावी. म्हणून सरकारी साहाय्याने सहकारी संस्थांचे जाळे विणले तर खेडोपाडी लक्ष्मी नांदू लागेल असा त्यांचा आडाखा.
 कदाचित, खेड्यापाड्यांच्या दारिद्र्याचे खरे कारण काळ्या इंग्रजांकडून होणाऱ्या भारताच्या शोषणात आहे हे त्यांना कळतही असेल; पण एवढ्या मगरमिठीच्या व्यवस्थेतून शेतकऱ्यांची सुटका शक्य नाही. तेव्हा सहकारी व्यवस्थेच्या मिषाने आपले, आपल्या आप्तसंबंधियांचे, पक्षकार्यकर्त्यांचे भले साधून घ्यावे असा सरळ राजकारणी डावही त्याच्यामागे असावा.
 सहकारी चळवळ फारशी कार्यक्षम होत नाही असा १५५५ पर्यंतचाच अनुभव होता. १९५५ मध्ये डॉ.धनंजयराव गाडगीळ यांनी 'ग्रामीण पतव्यवस्थेची पाहणी' पुरी केली होती. पाहणीचा निष्कर्ष स्पष्ट होता 'सहकार अयशस्वी झाला', पण गाडगीळसाहेबांची शिफारस होती 'तरीही सहकार यशस्वी झाला पाहिजे.'
 महाबळेश्वरच्या बैठकीनंतर सहकारी चळवळीला पक्षाच्या जुवाला जुंपण्याचे काम चालू झाले. सहकारी चळवळीचे आज जे रूप दिसते आहे त्याचे मूळ कारण महाबळेश्वरच्या या काँग्रेस बैठकीत आहे. यशवंतरावांनी आपल्या मोहक वाणीने आणि पाठीवर हात फिरवण्याच्या कलेने शेतकरी कामगार, कम्युनिस्ट इ. पक्षातील दिग्गज मंडळी कुशलतेने वळवून घेतली आणि सहकार आणि सरकार यांचे लक्ष्य साधले.
 महाबळेश्वरचा निर्णय काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरला. महाराष्ट्रात आजपर्यंत एकाही निवडणुकीत विरोधी पक्षांचे सरकार निवडून आलेले नाही. याचे महत्त्वाचे कारण पक्षाच्या हुकुमतीखालील सहकारी संस्थांचे जाळे हे सर्वमान्य आहे.
 महाराष्ट्रातील सहकारी संस्थांचे विशेष रूप आहे.
 फक्त सत्ताधाऱ्यांचे कुरण

 १) या सर्व संस्था काँग्रेस पक्षाच्या अधिपत्याखाली आहेत. ज्या काही थोड्याफार संस्था विरोधकांच्या हाती दिसतात त्या संस्था सुरुवातीला संस्थापक काँग्रेस पक्षात असताना तयार झाल्या, राजकीय फाटाफुटीमुळे संस्थापक किंवा त्यांचे वारसदार काँग्रेस सोडून निघाले; त्यामुळे काही काळ तरी या संस्था काँग्रेसच्या वर्चस्वाबाहेर राहिल्या; पण सहकार आणि सरकार यांची मगरमिठीच

बळिचे राज्य येणार आहे / ३२३