पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/320

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


महाबळेश्वरची मगरमिठी



 हकाराचा उगम
 सहकारी चळवळ इंग्रजी अमलात सुरू झाली, त्याला आता जवळजवळ ९०वर्षे झाली. इंग्रजी शासनाने सहकारी संस्थांसंबंधीचा कायदा केला; पण सहकारी संस्था चालू राहाव्यात यासाठी काही विशेष उत्साही आणि व्यापक कार्यक्रम हाती घेतला नाही.
 ग्रामीण भागांत त्या काळी जे काही थोडेफार छोटे उद्योगधंदे होते ते प्रामुख्याने खाजगी किंवा कंपन्यांचे होते,उद्योगधंद्यांकरिता लागणारे भांडवल शेतकऱ्यांना जमा करता येणार नाही आणि वित्तपुरवठाही वित्तसंस्थांकडून मिळणे दुरापास्त अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काही उद्योगधंदा उभारायचे ठरले तर शासनाकडून आणि वित्तीय संस्थांकडून त्यांच्या प्रयत्नास हातभार लागावा अशी मूळ सहकारी कायद्यामागील कल्पना.
 सहकाराचे अपहरण
 सहकारी चळवळीला एक वेगळे वळण लागले ते १९६० सालापासून. महाबळेश्वर येथे भरलेल्या काँग्रेसच्या एका बैठकीत आर्थिक विकासाकरिता सहकारी संघाचा वापर करण्याचे ठरले. हा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला होता, शासनाने नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामुळे मोडकळीस आलेल्या काँग्रेस पक्षाला तगवून धरण्याकरिता यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही नवी दिशा ठरवण्यात आली.

 सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, उपसा जलसिंचन योजना, दूध संघ इत्यादी उभे केले म्हणजे त्यांतून ग्रामीण भागाचा खराखुरा विकास होईल अशी यशवंतराव चव्हाण इत्यादी धुरिणांची भाबडी कल्पना होती. ग्रामीण भागाच्या दारिद्र्याचे मूळ कारण त्यांना समजले नव्हते, हे उघड आहे.

बळिचे राज्य येणार आहे / ३२२