पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/269

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सरकारी सहाय्य आणि अनुदान यांचा मोठा हिस्सा आहे. सहकारी चळवळी विषयी गर्व मिरवणाऱ्यांचे नाक उतरवण्यास हा किंमतीचा तक्ता पुरेसा आहे.

सन पुरुषोत्तम शेतकरी
संस्थेच्या किंमती
शंकर-४
महाराष्ट्र कापूस
एकाधिकारच्या किमती
एच-४
१९७४
६१५ ४५०
१९७५
४२६ २९९
१९७६
४९३ ३५५
१९७७
६७५ ५१४
१९७८
५६८ ४२०
१९७९
५४५ ३५२
१९८०
५७२ ---
१९८१
६८५ ५२०
१९८२
६०२ ५२०
१९८३
६५७ ५२०
१९८४
७४७ ५८०
१९८५
६७५ ५९२
१९८६
६१५ ५९२
१९८७
७७४ ---


 ३. सहकारी साखर चळवळीची शोकांतिका


 सहकारी चळवळीने शेतकऱ्यांचा उद्धार केला, सहकारी चळवळी म्हणजेच शेतकऱ्यांची एकमेव महत्त्वाची चळवळ हा विचार सहकारी साखर कारखान्यांच्या नेत्यांनी विशेष आग्रहाने मांडला आहे. साखर कारखाना काढावा, त्याच्या आधाराने पाण्याची व्यवस्था करून उसाखालचे क्षेत्र वाढवावे, लागवडीचे शास्त्रीय व्यवस्थापन करून ऊसशेतीची उत्पादकता आणि उसातील शर्करांश वाढवावा, वाहतूक आणि गळीत पूर्ण कार्यक्षमतेने चालवून साखरेचे उत्पादन वाढवावे म्हणजे ऊसउत्पादकांचे सर्वतोपरी कल्याण होईल अशी भूमिका सहकारी साखर कारखान्याच्या आद्य प्रणेत्यांनी मांडली होती. कारखान्यांची स्थापना केली आणि ते कार्यक्षमतेने चालवले म्हणजे कारखान्याच्या तिजोरीत जाऊन पडणारा फायदा शेतकऱ्यांच्या पदरी पडेल आणि त्यामुळे ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या मालाची चांगली, एवढेच नव्हे तर आकर्षक किंमत

बळिचे राज्य येणार आहे / २७१