पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/249

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तशी मान्यता मिळाली नाही. मराठवाड्याचे हे दुर्दैवच आहे!
 या निमित्ताने मला एक गोष्ट आठवते. जेरुसलेममध्ये ज्या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तो दिवस नाताळचा सण म्हणून साजरा केला जातो. ज्या वेळी येशूचा जन्म झाला त्याच्या आधी आकाशामध्ये एक तेजस्वी तारा दिसला होता. त्यावेळी तो तारा पाहून येशूच्या आधी जन्माला आलेले जे पाच संत पुरुष होते त्यांना कळले की जेरुसलेम येथे परमेश्वराचा जन्म होणार आहे आणि ते सगळे तिकडे जायला निघाले. ते जेरुसलेमला पोहोचले आणि त्यांनी त्या नवीन बाळाचे कौतुक केले. या पाचही संतांची कथा ओल्ड टेस्टामेंट आणि न्यू टेस्टामेंट दोन्हीमध्येही लिहिलेली आहे. पण, एक सत्य त्यात आलेले नाही की सामिरतान नावाचा त्याच प्रकारचा एक संत त्याच वेळी हा पश्चिम युरोपातून जेरुसलेमला जायला निघाला होता. वाटेत घनदाट जंगलांचा प्रदेश, त्याच्याबरोबरचे यात्रेकरू पुढे निघून गेल्याने तो एकटा पडला, जंगलात काही लुटारूंनी त्याला पकडले, मारहाण केली, त्याचे कपडे वगैरे काढून घेतले आणि त्याला समुद्रकिनाऱ्यावर गुलामांचा व्यापार करणारांपैकी एकाला विकले. येशू ख्रिस्ताचा पहिला शिष्य बनण्यासाठी निघालेल्या या माणसाला गुलामांच्या त्या व्यापाऱ्याने बोटीत घालून आफ्रिकेला नेले. अनेक वर्षे चाबकाचे फटके खात गुलामगिरीच्या यातना सोसल्यानंतर त्याला एक दिवस संधी मिळाली आणि त्याने त्या गुलामांच्या व्यापाऱ्याच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि पुन्हा जेरुसलेमची वाट धरली. पुन्हा अत्यंत कष्ट करत अखेरी तो जेरुसलेमला पोहोचला. त्याला आशा होती की ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी आकाशातील तारा पाहून निघालो होतो त्या जन्मवेळी नाही जमले तरी त्या स्थळीतरी आता आपण जाऊन आता त्याचे दर्शन घेऊ; पण सामिरतान जेरुसलेमला पोहोचला त्या दिवशी येशू ख्रिस्ताला सुळावर दिले होते. सामिरतानच्या नशिबी सुळी दिलेल्या येशू ख्रिस्ताला सुळावरून उतरवण्याचे काम आले.
 ज्ञानेश्वर मोठा का झाला आणि मुकुंदराज मागे का पडले हे प्रश्न कोणी विचारते का? असले प्रश्न त्यांच्या विचारांची दुकानदारी करणारांनाच पडतात.

 एक काळ असा होता, एकोणीसशे सत्तर-ऐंशीच्या दशकाचा, की शेतकऱ्यांच्या लक्षात यायला लागले की, 'आता आपण अडाणी शेतकरी राहिलो नाही, जेथे दोनतीन क्विंटल पिकत होते तिथे आता वीसवीस, तीसतीस क्विंटल पिकवू लागलो आहोत; पण जितके जास्त पिकवावे तितकी कमी

बळिचे राज्य येणार आहे / २५१