पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/245

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 २००८-०९चा अर्थसंकल्प आगामी निवडणुकांचा वेध घेणार आहे वेगवेगळ्या समाजघटकांसाठी त्यात खैरात केली आहे या अर्थाने नव्हे, तर अर्थमंत्र्यांनी आपली कर्जमाफीची घोषणा करून सर्वच विरोधी पक्षांचा शेतकरी कळवळ्याचा दांभिकपणा प्रकाशात आणला आणि त्याचवेळी शेतकरी चळवळीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्नही केला आहे. या अर्थाने हा अर्थसंकल्प येत्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मांडला गेला आहे.

(शेतकरी संघटक, ६ मार्च २००८)

बळिचे राज्य येणार आहे / २४७