पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/241

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


कर्जमाफी आणि सूट योजना

फोडा आणि नष्ट करा



 रवर्षी, अर्थसंकल्प सादर झाला की पाठोपाठ त्या अर्थसंकल्पातील तरतुदींचा समाजातील कोणत्या घटकांना कसा कसा आणि किती कमीअधिक लाभ होईल याबाबत लोकानुरंजनी प्रतिक्रिया देणारी चर्चा सुरू होते. शेअर बाजारात हातचलाखी करून काहीही घडवता येऊ शकते अशा संशयामुळे शेअर बाजाराला हीन लेखले जाते; पण मग लोकप्रियतेचे प्रदर्शन करणारी निदर्शनेही घडवून आणता येतात. यावर्षी अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी दिल्लीतील '१० जनपथ'समोर काँग्रेस आणि संपुआच्या नेत्यांनी शेतकऱ्यांसारख्या दिसणाऱ्या लोकांची अशीच गर्दी जमा केली होती. ही गर्दी सोनिया गांधींचा जयजयकार करायला जमली होती की धिक्कार हे उचित समय होताच ठरणार होते. शेवटी ट्रॅक्टर-ट्रॉल्यांमधून आलेली ही मंडळी तरुण हुडांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस अध्यक्षांवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाच्या आवारात घुसली.
 पी. चिदंबरम् यांच्या कर्जमाफी आणि सूट योजनेच्या प्रथमदर्शनाने झालेल्या अत्यानंदात दोनतीन रात्री खुशीची गाजरे खाल्ल्यानंतर शेतकऱ्यांना आता अर्थमंत्र्यांनी केलेल्या खेळीची क्रूर आणि धूर्त बाजू समजू लागली आहे; ही खेळी शेतकरी समाजाचे भल्यापेक्षा नुकसानच अधिक करणार आहे.
 कर्जबाजारीपणाचे मूळ

 शेतकरी घेतलेली कर्जे परत फेडण्यास असमर्थ आहे याचे मूळ कारण शेती एकूणातच अकिफायतशीर असणे हे आहे हे आता सर्वमान्य झाले आहे आणि शेतीचा हा अकिफायतशीरपणा शेतीमालाच्या बाजारपेठेत सरकारने

बळिचे राज्य येणार आहे / २४३