पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/230

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दोघातही नाही - अशा परिस्थितीत पुढची वाटचाल कशी करावी याचा निर्णय स्वतः शेतकऱ्यांनाच करायचा आहे.
 शेतकरी आंदोलनाची वाटचाल मोठी कठीणच झाली; पण बळिराजाच्या कृपेने आजपर्यंत वाचून राहिली. 'बचेंगे तो और भी लडेंगे', सर्व शेतकऱ्यांची माय शेतकरी संघटना. तिला चौफेर वेढणाऱ्या शत्रूपासून वाचवायचे कसे हा थोडक्यात प्रश्न आहे. पुन्हा एकदा संघटना जीवघेण्या संकटात सापडली आहे. शेतीवर पोट भरणाऱ्या आणि सन्मानाने जगू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना हे निमंत्रण म्हणजे मदतीस धावून येण्याची हाक आहे.

(शेतकरी संघटक, ६ जानेवारी २००५)

बळिचे राज्य येणार आहे / २३२