पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/223

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संघटनेची व आंदोलनाची दिशा ठरवण्याची आवश्यता वाटते तेव्हा तेव्हा शेतकरी संघटनेचे अधिवेशन भरवण्यात येते.
 शेतकरी महिला आघाडीची स्थापना १९८६ सालच्या चांदवड येथे भरविलेल्या शेतकरी महिला अधिवेशनात झाली. त्यानंतर अमरावती (१९८९) व रावेरी (२००१) येथे महिला आघाडीची स्वायत्त अधिवेशने भरविण्यात आली. शेतकरी संघटना आणि शेतकरी महिला आघाडी यांचे घनिष्ठ संबंध लक्षात घेता अमरावती येथील शेतकरी महिला अधिवेशनावर 'बाबरी मशीद अयोध्या मंदिर' प्रकरणातील जातीय दंगलींची सावली पडावी हे समजण्यासारखे आहे. रावेरी अधिवेशनातही विदर्भ आणि मराठवाड्यात धगधगू लागलेल्या कापूस प्रश्नाची नोंद घ्यावी लागली. एवढेच नव्हे तर, रावेरीच्या सर्व अधिवेशनाचे कापूस आंदोलनाच्या मोर्चात रूपांतर झाले. अपरिहार्यपणे समग्र शेतकरी समाजाला कौल लावण्याकरिता भरवलेले अधिवेशन हे समग्र शेतकरी परिवाराचे अधिवेशन ठरते. या सर्व परिवारात शेतकरी युवा आघाडीला वेगळे स्थान नव्हते. शेतकरी युवा आघाडीचे बांधणी अधिवेशन दौंड येथे (जानेवारी २००२) भरवण्यात आले.
 अधिवेशन केव्हा भरवावे, दोन अधिवेशनांतील कालावधी किती असावा यासंबंधी अर्थातच काही नियम नाही. ही अध्यक्षांच्या अखत्यारीतील गोष्ट आहे. अनेकवेळा एक अधिवेशन झाल्यानंतर थोड्याच काळात काही व्यापक प्रश्न उभे राहिले, परिस्थितीत पालट झाला तेव्हा शेतकरी मेळावे, परिषदा भरवून शेतकऱ्यांना कौल लावण्यात आला.
 डॉ. मनमोहनसिंग व श्री. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली खुल्या व्यवस्थेचे धोरण जाहीर झाल्यानंतर शेगाव येथे (नोव्हेंबर १९९१) वेगळा मेळावा भरवण्यात आला. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती आंदोलनाची घोषणा करण्यासाठी जळगाव (१९८८) येथे शेतकऱ्यांचा राजा छत्रपती शिवाजी व दलितांचे कैवारी डॉ. आंबेडकर यांचा संयुक्त जयंती मेळावा भरवण्यात आला. स्वातंत्र्याच्या ५० वर्षांच्या प्रगतीचा ताळेबंद मांडून 'स्वातंत्र्य का नासले ?' याचा हिशेब घेण्याकरिता अमरावती येथे १९९८ साली जनसंसद भरवण्यात आली.

 दक्षिण महाराष्ट्र मोटार सायकल यात्रेचा समारोप कोपरगावच्या मेळाव्यात झाला. महाराष्ट्र प्रचारयात्रेचा समारोप ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी टेहरे (मालेगाव) येथे झाला. म. फुले विचार प्रचार यात्रेचा समारोप विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे झाला. त्यापूर्वीही राजकीय पर्याय निर्माण करण्याच्या

बळिचे राज्य येणार आहे / २२५