पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/214

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


शेतकरी जाती'चा विद्वेष कधी संपणार



 क्षिण आफ्रिकेत दरबान येथे संयुक्त राष्ट्र संघाची 'वंशभेद आणि वंशविद्वेष' या विषयावर एक जागतिक परिषद भरली आहे.
 वंशविद्वेषाचा अधिकृत जनक हिटलर. त्याआधीही खुद्द अमेरिकेत निग्रोवंशीयांना गुलाम म्हणून आणले गेले. अमेरिकेतील यादवी युद्धानंतर अब्राहम लिंकनच्या थोर नेतृत्वामुळे गुलामगिरी संपुष्टात आली; पण निग्रो लोकांविषयी भेदाभेदाची वागणूक अजूनही आहे. तसेच साऱ्या गोऱ्या लोकांच्या देशात काळ्या किंवा निमकाळ्या वर्णाच्या लोकांबद्दल किमान दुजाभाव आहे. विशेष प्रसंगाने हा दुजाभाव उफाळतो, काहीवेळा त्यातून दंगलीही होतात, रक्तपात, जाळपोळही होते. गोऱ्या गोऱ्यांच्या समाजातही अनेक ठिकाणी वंशविद्वेष आढळून येतो. हिटलरने उभा केलेला ज्यू-द्वेषाचा ब्रह्मराक्षस हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण. आजही फ्रान्स, जर्मनी या देशांत ग्रीस, इटली आणि स्पेन या देशांतून रोजगाराकरिता आलेल्या मजुरांबद्दल एक वंशभेदाची भावना सर्रास आढळते.
 यापूर्वी, संयुक्त राष्ट्र संघाच्या अनेक परिषदांमध्ये वंशविद्वेषाचा विषय चर्चिला गेला, अनेक ठरावही झाले. या चर्चांचा संदर्भ मुख्यतः दक्षिण आफ्रिकेतील भारतीय आणि काळ्या लोकांना दिल्या जाणाऱ्या पक्षपाताच्या वागणुकीच्या संबंधात होता. श्रीमती विजयालक्ष्मी पंडित संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण परिषदेच्या अध्यक्षा असताना हा विषय खूप गाजला. दक्षिण आफ्रिकेतील वंशद्वेषी राजवट संपुष्टात आली याचे मोठे श्रेय संयुक्त राष्ट्र संघास देणे भाग आहे.

 द. आफ्रिकेतील वंशविद्वेषाच्या राज्यव्यवस्थेबद्दल अगदी सुरुवातीचे आंदोलन महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झाले, त्यामुळे तेथील वंशभेदाच्या प्रश्नाविषयी

बळिचे राज्य येणार आहे / २१६