पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/201

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


शेतकरी स्वातंत्र्याचा जाहिरनामा



 भ्या भारतवर्षातील आम्ही शेतकरी,
 एका ऐतिहासिक कलाटणीच्या क्षणी, दिल्ली येथे ६ एप्रिल २००१ रोजी एकत्र येऊन सर्व शक्तिनिशी जगाच्या निदर्शनास आमची कैफियत आणू इच्छितो;
 भारतातील शेतकरी शतकानुशतके अस्मानी आणि सुलतानी यांनी पीडला गेला आहे. भरपूर सूर्यप्रकाश, मुबलक पाणी यांची नैसर्गिक देणगी देशाला लाभली आहे. सर्व संकटांचा सामना करणाऱ्या कष्टकरी उद्यमी शेतकऱ्यांच्या बळावर देश समृद्धीच्या शिखरावर निसर्गसिद्ध पोहोचला असता.
 प्रत्यक्षात, पावसाच्या लहरीप्रमाणे शेतीचा जुगार चालत राहिला; हजारो वर्षे नित्यनियमाने दुष्काळ, महापूर येत गेले; शेतीची धूळधाण होत राहिली. ज्यावर्षी भरपूर पीक आले त्यावर्षीही सुल्तानीचा तडाखा बसे. परिणामत: दुष्काळाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्याकडे काही उरत नसे.
 ही सुलतानी स्थानिक राजांनी केली, स्वधर्मीयांनी केली, दूरच्या राजांनी केली, परकीय आक्रमकांनी केली, परधर्मीयांनी केली. गोऱ्या इंग्रजांच्या अंमलापर्यंत हे असेच अव्याहत चालू राहिले.
 इंग्रजी आमदानीत शेतकऱ्यांच्या मुलांना निदान शिकण्याची संधी मिळाली. जातीव्यवस्थेच्या जुलूमातून सुटका होण्याची आणि शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाने काही प्रगती होण्याची आशा वाटू लागली तोच स्वराज्य आले.

 स्वराज्याच्या काळात शेतीच्या शोषणाची धोरणे संपतील आणि शेतीतील उत्पादन व उत्पादकता वाढविणारी धोरणे राबविली जातील अशी आशा होती ती लवकरच मालवली. देशाची अन्नधान्याची गरज परदेशातून केलेल्या आयातीतून भागत असेल तर शेतीकडे दुर्लक्ष करायलाही हरकत नाही असा

बळिचे राज्य येणार आहे / २०३