पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/176

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राबूनसुद्धा माझं दररोजचं भागू नये आणि दुष्काळ आला म्हणजे मला खडी फोडायला जावं लागावं अशा जाणीवपूर्वक योजना व धोरणं आखली जात आहेत तेव्हा त्याविरुद्ध उठण्याखेरीज गत्यंतर नाही, म्हणून मी या मार्गाला लागलो.
 सुधाकरराव, तुम्ही जर हा शेतकऱ्यांचा प्रश्न उठवला तर या कामातनं मी मोकळा होईन आणि शेतकऱ्यांना एक दिवस सांगू शकेल की आता आपल्याला आंदोलन करण्याची गरज नाही. कारण, शेतातला शेतकरी 'राजा' झाला आहे. एवढं सांगायला मिळावं आणि मग निवृत्त व्हायला मिळावं एवढी एक इच्छा स्व. वसंतराव नाईकांच्या पुण्यस्मृतीच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या साक्षीने करतो.

(शेतकरी संघटक, ६ सप्टेंबर १९९२)

बळिचे राज्य येणार आहे / १७८