पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/143

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अपघातामुळे असे म्हटले तर चूक होणार नाही.
 देशाच्या रंगमंचावर एक नवा अंक चालू होतो आहे. त्यातून कदाचित शेतकरीच नव्हे तर सर्व शोषित जनांना आशादायक वाटणारी पहाटही दिसू शकेल; याउलट, जातीयवादी आणि धर्मवादी यांच्या हुकूमशाहीची काळीकुट्ट रात्रही पसरू शकेल. शेतकरी आंदोलनाला यातून वाट काढायची असेल तर गेल्या दहा वर्षांच्या वाटचालीचे परखड आणि प्रामाणिक आत्मविश्लेषण आवश्यक आहे. नवीन फौजा उभाराव्या लागतील. नव्या ताज्या दमाचे नेतृत्व सर्व पातळ्यांवर उभे व्हावे लागेल.

(शेतकरी संघटक, ६ जून १९९०)

बळिचे राज्य येणार आहे / १४५