पान:बळीचे राज्य येणार आहे! (Baliche Rajya Yenar Aahe!).pdf/136

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होतो. कालखंडाच्या जवळपणामुळे शेतकरी आंदोलनाच्या यशापयशाच्या आधारेच मी माझ्या आयुष्याचे मूल्यमापन करू लागतो. शेतकरी आंदोलन माझ्या दृष्टीने एक संदर्भरेषा होती. शेतकरी संघटना सुरू करण्याआधी माझे जे विचारविश्व होते त्याला संघटनेमुळे प्रचंड व्यापकता आली, पुष्कळशा संकल्पना स्पष्ट झाल्या. हे संघटनेचे ऋण मान्य केलेच पाहिजे; पण शेतकरी आंदोलनाचे अपयश हे फार तर माझ्या आयुष्याच्या एका कालखंडातील प्रयोगाचे अपयश मानणे योग्य होईल. शेतकरी आंदोलनानंतरही माझी आनंदयात्रा चालूच राहणार आहे.
 स्वित्झर्लंड सोडून येथे येताना तेथील अनेक सहकाऱ्यांची मने दुखवावी लागली, तुडवावी लागली. यापुढच्या माझ्या मार्गक्रमणेत हाही दाहक अनुभव पुन्हा एकदा घ्यावा लागेल. ही नियती नाकारणे माझ्या हाती नाही आणि कोणाच्याच हाती नाही.

(शेतकरी संघटक, ३० ऑगस्ट २००९)

बळिचे राज्य येणार आहे / १३८